Download App

Tiger Shroff: ‘टायगर इफेक्ट’ अभिनेता टायगर श्रॉफ ठरतोय अनेक ब्रँडचा चेहरा

Tiger Shroff Brand Ambassador: टायगर श्रॉफचे (Tiger Shroff) नाव बॉलिवूडच्या टॉप अ‍ॅक्शन सुपरस्टार्सच्या यादीत आहे. जॅकी श्रॉफचा लाडका मुलगा त्याच्या सिक्स पॅक अ‍ॅब्स आणि डांसिग स्किल्समुळे नेहमी चर्चेचा विषय राहिला आहे. बॉलिवूडमधील सगळ्याच स्टार्सचे प्रोफेशनल लाईफसोबतच पर्सनल लाईफ देखील चर्चेत असते. स्टार किड असूनही टायगर श्रॉफने चित्रपट जगात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. म्हणून त्याची करिश्मा ब्रँड अॅम्बेसेडर (Brand Ambassador) म्हणून कायम दिसून येत आहे.


सर्वात तरुण अॅक्शन सुपरस्टार असल्याने श्रॉफची लोकप्रियता आणि आकर्षण हे चाहत्यांना आकर्षित करत आहे. तसेच फिटनेस ब्रँड्सपासून फॅशन लेबल्सपर्यंत, टायगरची अनोखी प्रतिमा ही कायम सगळयांनी अनुभवली आहे. त्याचे डायनॅमिक व्यक्तिमत्व, सोशल मीडियावर सक्रिय राहणं त्याच्यासाठी उत्तम ठरत आहे.

टायगर श्रॉफने सेलिब्रेटींच्या जाहिरातींवर वर्चस्व कायम ठेवल्यामुळे तो उद्योग स्टार आणि तो प्रतिनिधित्व करत असलेल्या अनेक ब्रँड्चा फेवरेट चेहरा ठरला आहे. गेल्या काही दिवसापूर्वी जपानी कंपनी Asics च्या जाहिरात करताना दिसला आहे. जपानी कंपनी भारतातील स्पोर्ट्स स्टाईल आणि ऍथलीझर विभागात आपली उपस्थिती वाढवली होती.

Fighter Teaser Release: ‘देशभक्तीवर आधारित ‘फायटर’चा धमाकेदार टीझर प्रदर्शित

टायगर श्रॉफ सिनेमे आणि जाहिरातींच्या माध्यमातून चांगलीच जोरदार कमाई करतो. एका सिनेमासाठी ‘अॅक्शन हीरो’ 8 कोटी मानधन घेत असतो. तर एका जाहिरातीचे तो दोन-तीन कोटी घेत असतो. वर्षभरात टायगर 12 कोटींची कमाई करतो. त्याची एकूण संपत्ती 81 कोटी आहे. आलिशान घरासोबत अनेक महागड्या गाड्यादेखील त्याच्याकडे बघायला मिळत असतात.

टायगर श्रॉफ सातत्यपूर्ण कामगिरी करून आकर्षक आणि संबंधित ब्रँड अॅम्बेसेडरच्या मार्केटर्ससाठी एक प्रमुख पर्याय म्हणून ओळखला जात आहे. टायगर आगामी “बडे मियाँ छोटे मियाँ”, रोहित धवन दिग्दर्शित सिद्धार्थ आनंदची निर्मिती “रॅम्बो”, आणि रोहित शेट्टीचा बहुप्रतिक्षित “सिंघम अगेन” यासारख्या अनेक प्रोजेक्ट्स मध्ये दिसणार आहे.

Tags

follow us