Download App

Tiger Shroff: … म्हणून टायगर श्रॉफ ‘रॅम्बो’ साठी कास्ट झाला

Tiger Shroff: अ‍ॅक्शन फिल्म्स करून कायम चर्चेत राहिलेला अभिनेता म्हणजे टायगर श्रॉफ (Tiger Shroff). टायगर हा त्याच्या पिढीतील पहिला हिंदी चित्रपटसृष्टीतील अॅक्शन हिरो बनला आहे. त्याने त्याच्या अभिनयाने आपल करिअर उत्तम साकारलं आहे. (Singham again) त्याच्या एकेरी भूमिका आणि अफलातून अॅक्शन स्टंट्सने प्रेक्षकांना मोहित केलं आहे,  म्हणून टायगर श्रॉफ ‘रॅम्बो’ साठी कास्ट झाला.


मोठा अॅक्शन सुपरस्टार म्हणून त्याने आपल नाव कमावलं असून मार्शल आर्ट्स आणि पार्करमधील प्रशिक्षणासाठी अनेक वर्षांचे मेहनत करून त्याने प्रत्येक स्टंट केले आहे. इंडस्ट्रीतील एका व्यक्तीने स्पष्ट केले की, “टायगरने वेगळ्या भूमिका करत कठीण शैली निवडली आहे. तो खूप मेहनत घेऊन प्रशिक्षण घेतो आणि कठीण स्टंट्स सहज करून दाखवत असतो.

दिग्दर्शक आणि निर्माता सिद्धार्थ आनंदने रॅम्बोच्या हिंदीमध्ये रिमेक करण्याच ठरवलं. त्यावेळेस त्यांनी टायगर श्रॉफला प्रकल्पातील पहिला अभिनेता म्हणून साइन केले होते. चित्रपटाचे प्री-प्रॉडक्शन सुरू आहे आणि निर्माते पुढच्या वर्षीच्या सुरुवातीला चित्रपटाचे रोलिंग सुरू करणार आहेत. यामध्ये टायगरची निवड झाल्याचे स्पष्ट आहे. अभिनेता जो करतो अस कोणी करू शकत नाही. त्याच्या पिढीतील अनेक कलाकार आता अॅक्शन चित्रपट करण्याचा प्रयत्न करत असले तरीही त्याची मेहनत उल्लेखनीय ठरली आहे.

Delivery Boy: 9 फेब्रुवारीला भेटीला येणार ‘डिलिव्हरी बॅाय’

सध्या टायगर स्वत: वर काम करत असून त्याच्या अॅक्शन चित्रपटांच्या शैलीसाठी तयारी करत असल्याची माहिती समोर आली आहे. टायगर श्रॉफ सातत्यपूर्ण कामगिरी करून आकर्षक आणि संबंधित ब्रँड अॅम्बेसेडरच्या मार्केटर्ससाठी एक प्रमुख पर्याय म्हणून ओळखला जात आहे. टायगर आगामी “बडे मियाँ छोटे मियाँ”, रोहित धवन दिग्दर्शित सिद्धार्थ आनंदची निर्मिती “रॅम्बो”, आणि रोहित शेट्टीचा बहुप्रतिक्षित “सिंघम अगेन” यासारख्या अनेक प्रोजेक्ट्स मध्ये दिसणार आहे.

Tags

follow us

वेब स्टोरीज