Tim Cook with Madhuri Dixit : …म्हणून थेट अ‍ॅपलच्या सीईओंनी मानले माधुरीचे आभार

Tim Cook with Madhuri Dixit : मुंबईमध्ये ऑफिशियल अ‍ॅपल (APPLE) स्टोर ओपन होणार आहे. यासाठी अ‍ॅपलच्या सीईओ टिम कुक सध्या मुंबईत आले आहेत. त्यामुळे ते मुंबईत आसले आणि ते बॉलिवूडच्या सेलिब्रेटींना भेटणार नाही असं होणं अशक्य. त्यामुळे टिम कुक यांनी सोमवारी बालिवूडची एव्हर ग्रीन अभिनेत्री माधुरी दीक्षितला भेटले. माधुरीने देखील टिम कुक यांचं मुंबईच्या स्टाईलमध्ये […]

Madhuri Tim

Madhuri Tim

Tim Cook with Madhuri Dixit : मुंबईमध्ये ऑफिशियल अ‍ॅपल (APPLE) स्टोर ओपन होणार आहे. यासाठी अ‍ॅपलच्या सीईओ टिम कुक सध्या मुंबईत आले आहेत. त्यामुळे ते मुंबईत आसले आणि ते बॉलिवूडच्या सेलिब्रेटींना भेटणार नाही असं होणं अशक्य. त्यामुळे टिम कुक यांनी सोमवारी बालिवूडची एव्हर ग्रीन अभिनेत्री माधुरी दीक्षितला भेटले. माधुरीने देखील टिम कुक यांचं मुंबईच्या स्टाईलमध्ये स्वागत केलं.

आता माधुरीने मुंबईच्या स्टाईलमध्ये स्वागत केलं म्हणजे काय केलं तर माधुरीने थेट अ‍ॅपलच्या सीईओंना मुंबईच्या खाद्य संस्कृतीची आणि मुंबईची ओळख असलेला वडा-पाव टीम कूक यांना खाऊ घातला आहे. हा वडा-पाव खातानाचा फोटो माधुरीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. तर टीम कूक यांनी देखील त्यांच्या ट्विटर अकाउंटवर हा फोटो शेअर केला आहे.

या फोटोमध्ये अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि टिम कुक वडापावचा आनंद घेताना दिसत आहेत तर माधुरीने हा फोटो शेअर करत आपल्या कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘वडापाव पेक्षा चांगल स्वागत मुंबईमध्ये असूच शकत नाही.’ तिने या कॅप्शनमध्ये टीम कूक यांचे हॅशटॅक दिले आहेत.

दुसरीकडे टीम कूक यांनी देखील त्यांच्या ट्विटर अकाउंटवर लिहिले की, धन्यवाद माधुरी मला माझ्या आयुष्यातील पहिला वडा-पाव खाऊ घातल्याबद्दल. तर हा वडा-पाव खुपच चविष्ट आहे.

फिल्म इंडस्ट्रीत मोठे सेक्स रॅकेट उघड, कास्टिंग डायरेक्टर Aarti Mittal ला बेड्या

दरम्यान देशातील पहलं ऑफिशियल अ‍ॅपल स्टोर मुंबईच्या बीकेसी बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये ओपन होणार आहे. याबद्दल कुकने सोमवार संध्याकाळी एक ट्वीट केलं. त्यामध्ये ते म्हणाले की, ‘हॅलो मुंबई! आम्ही आमच्या नव्या अ‍ॅपल बीकेसीमध्ये आमच्या ग्राहकांचं स्वागत करण्यासाठी उत्सुक आहोत.’

Exit mobile version