मुंबई : ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक सतिश कौशिक (Satish Kaushik Death) यांच्या मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण लागले आहे. कौशिक यांचा मृत्यू संशयास्पद असल्याचा दिल्ली पोलीसांचा (Delhi Police) दावा आहे. ज्या फार्म हाऊसवर सतिश कौशिक थांबले होते त्या ठिकाणी पोलीसांनी तपासणी केली असता आक्षेपार्हय औषध सापडली आहेत. होळीच्या (Holi) पार्टीसाठी आलेल्या पाहुण्यांची देखील पोलीसांनी लिस्ट केली आहे. त्यातील एक उद्योगपती फरार असल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले आहे.
सतिश कौशिक यांच्या मृत्यूची पोलीसांना जेव्हा माहिती मिळाली होती त्यावेळी त्या फार्म हाऊसवर गेले होते. त्याठिकाणी काही आक्षेपार्हय औषधं मिळाले आहेत. पोलीसांनी पोस्टमार्टम रिपोर्टची मागणी केली आहे. त्याच बरोबर दुसरा रिपोर्ट येण्याची पोलीस वाट बघत आहेत. यातून कौशिक यांचा मृत्यू कशामुळे झाला? मृत्यू झाला त्यावेळी त्यांच्या शरीरात काय होतं? हे निष्पन्न होणार आहे.
त्याचबरोबर फरार झालेला उद्योगपतीचाही शोध घेतला जात आहे. त्यानंतर त्याची चौकशी केली जाणार आहे. त्यामुळे दिल्ली पोलीसांनी चौकशीला वेग दिला आहे. कौशिक यांचा मृत्यू कार्डियाक अॅरेस्टमुळे झाल्याचे पोस्ट मार्टम रिपोर्ट मध्ये नमूद केलं आहे. मात्र दिल्ली पोलीसांना वेगळाच संशय आहे.
दरम्यान, सतीश कौशिक यांचे जवळचे मित्र बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर यांनी त्यांच्या मृत्यूची माहिती दिली होती. शवविच्छेदनानंतर त्यांचे पार्थिव मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी नेण्यात आले होते. तिथेच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अनुपम खेर यांनी सांगितले होते की, सतीश कौशिक हे गुडगावमधील एका फार्महाऊसवर कोणालातरी भेटण्यासाठी गेले होते. फार्महाऊसवरून परतत असताना सतीश कौशिक यांना कारमध्ये हृदयविकाराचा झटका आला आणि त्यानंतर त्यांना गुडगावमधील फोर्टिस रुग्णालयात नेण्यात आले होते.