Hasan Mushrif : वातावरण पेटले; ईडी अधिकाऱ्यांना बाहेर न जाऊ देण्याचा मुश्रीफांच्या कार्यकर्त्यांचा पवित्रा

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 03 11T113525.778

ED Raid at Hasna Mushrif House :  राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP )  ज्येष्ठ नेते व माजी मंत्री हसन मुश्रीफ ( Hasan Mushrif ) यांची गेल्या काही दिवसांपासून ईडीच्या माध्यामातून चौकशी सुरु आहे. आज पुन्हा ईडीचे अधिकारी मुश्रीफ यांच्या कागल येथील निवासस्थानी दाखल झाले आहेत.  आज पहाटेपासून त्यांच्या घरी छापेमारी सुरु झालेली आहे. गेल्या दीड महिन्यातील ही दुसरी छापेमारी आहे. जवळपास चार ते पाच ईडीचे अधिकारी त्यांच्या घरी तपास करत असल्याची माहिती आहे. यावरुन मुश्रीफ यांचे कार्यकर्ते चांगलेच संतप्त झाले आहेत.

हसन मुश्रीफांवरील या कारवाईच्या विरोधात मुश्रीफ यांचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेले आहेत. त्यांच्या कार्यकर्त्यांनी मुश्रीफ यांच्या घराबाहेर गर्दी केली आहे. यावेळी ते भाजपच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आहेत. तसेच ईडीच्या अधिकाऱ्यांना येथून बाहेर जाऊ देणार नाही, असा पवित्रा तेथील कार्यकर्त्यांनी घेतला आहे. या सगळ्या प्रकरणावर हसन मुश्रीफ यांच्या पत्नी सायरा मुश्रीफ यांनी संतप्त प्रतिक्रिया दिलेली आहे. आम्हाला गोळ्या घालून जा, असे त्या म्हणाल्या आहेत.

Hasan Mushrif यांच्या घरी पुन्हा ईडी अधिकारी, दोन महिन्यात तिसरी कारवाई

दरम्यान  हसन मुश्रीफ यांच्यावर अप्पासाहेब नलावड साखर कारखाना खरेदी करताना 100 कोटी घोटाळ्याचा आरोप आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केलेले आहेत. साखर कारखाना खरेदी करताना काळा पैसा गुंतवल्याचा देखील त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. मुश्रीफ यांच्या जवळच्या व्यक्तींनी कारखाना खरेदी केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलेला आहे. याआधी 11 जानेवारी रोजी मुश्रीफ यांच्या घरावर ईडीने छापेमारी केली होती.

Maharashtra Budget : आम्ही गाजर हलवा तरी दिला त्यांनी तर फक्त गाजरं दिली होती, एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना टोला

या छापेमारीवरुन राष्ट्रावादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. हा जो प्रकार आहे तो पूर्णपणे चुकीचा आहे. याआधी देखील दोन वेळा ईडीने त्यांच्या घरी छापेमारी केली होती. ईडीने अनिल देशमुख यांच्या घरी 109 वेळा छापेमारी केली होती. त्यांना तो रेकॉर्ड मोडायचा असावा असे त्या म्हणाल्या आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube