Hasan Mushrif यांच्या घरी पुन्हा ईडी अधिकारी, दोन महिन्यात तिसरी कारवाई
कोल्हापूर : राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या घरी आज पुन्हा ईडीचे अधिकारी दाखल झालेले आहेत. त्यांच्या कागल येथील ही कारवाई करण्यात येत आहे. आज सकाळीच हे ईडीचे अधिकारी मुश्रीफ यांच्या घरी दाखल झालेले आहेत. या अगोदर मुश्रीफ यांच्या कोल्हापूर येथील घरावर ईडीने धाड टाकली होती. त्यामुळे गेल्या दोन महिन्यातील हसन मुश्रीफ यांच्या घरी ईडीचे अधिकारी दाखल होण्याची ही दुसरी वेळ आहे. तसेच त्यांच्या संबंधित कारवाई करताना जिल्हा बॅंकेवर देखील ईडीकडून छापा टाकण्यात आला होता.
शुक्रवारी देखील हसन मुश्रीफ यांच्या घरी आज पुन्हा ईडीचे अधिकारी दाखल झालेले आहेत. अशा चर्चा सुरू होत्या. मात्र प्रत्यक्षात आज त्यांच्या कागल येथील ही कारवाई करण्यात येत आहे.पहाटे 4 ते 5 अधिकाऱ्यांचे पथक मुश्रीफ यांच्या घरी दाखल झालं. यावेळी मुश्रीफ यांच्या घरामध्ये त्यांचे कुटुंबीय होते. स्वतः हसन मुश्रीफ हे अधिवेशनामुळे मुंबईत होते. ते पहाटेच्या सुमारास कोल्हापुरात येणार होते. पण अद्याप आले आहेत की, नाही हे काळालेलं नाही. गेल्या वेळी देखील त्यांच्या घरातून ईडीला काही कागदपत्र मिळाल्याची माहिती मिळाली होती. आता यावेळी त्यांना काय मिळणार याकडे लक्ष लागले आहे.
संपुर्ण प्रकरण काय ?
Letsupp Special रामदासभाईंनी अनिल परबांसाठी खड्डा खोदला पण सख्खा भाऊच अडकला!
हे सर्व प्रकरण सांगायचं झालं तर, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी विविध प्रकारे राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या विरोधात तक्रार केली होती. त्यानंतर मुश्रीफ यांच्यामागे कारवाईचा ससेमिरा सुरू झाला आहे. त्यांच्या दोन कारखन्यांसंदर्भात ही कारवाई करण्यात येत आहे. यामध्ये सरसेनापती साकर कारखाना आणि गडहिंग्लजचा कारखाना यांचा समावेश आहे. गडहिंग्लजचा कारखाना ब्रिक्स या कंपनीने चालवायला घेतला होता. तर ही कंपनी मुश्रीफ यांच्या नातेवाईकांची आहे. याला वेगवेगळ्या पद्धतीने कर्ज दिल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे.