Download App

‘TMKOC’ मालिकेतील रोशन सिंह सोढी बेपत्ता, 11 दिवसांनंतर मोठी अपडेट आली समोर

Taarak Mehta Ka Ooltah Chashma: लोकप्रिय अभिनेता गुरचरण सिंह (Gurucharan Singh) गेल्या 11 दिवसांपासून बेपत्ता आहे.

Gurucharan Singh New Update: सोनी सब टीव्हीवरील प्रसिद्ध टेलिव्हिजन मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’चा (Taarak Mehta Ka Ooltah Chashma) लोकप्रिय अभिनेता गुरचरण सिंह (Gurucharan Singh) गेल्या 11 दिवसांपासून बेपत्ता आहे. टीएमकेओसीमध्ये (TMKOC) ‘रोशन सिंग सोधी’ची भूमिका साकारणारे गुरुचरण सिंग दिल्लीतून बेपत्ता झाले होते. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) अपहरणाची तक्रारही नोंदवली आहे. आता या संपूर्ण प्रकरणात एक नवीन अपडेट समोर आले आहे.


या संदर्भात दिल्ली पोलिसांची एक टीम आता मुंबईत पोहोचली असून लवकरच मुंबई पोलिसांसह (Mumbai Police) दिल्ली पोलिसांची ही टीम गुरुचरण सिंह यांच्या मित्रांची आणि ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या स्टार कास्टची चौकशी करणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सर्व प्रथम पोलिसांचे पथक मुंबईतील मालाड येथील गुरुचरणच्या घरी जाऊन त्यांच्या घराची तपासणी करेल आणि अभिनेत्याच्या शेजाऱ्यांचीही गुरुचरणबद्दल चौकशी केली जाणार आहे. यावेळी भक्ती सोनी यांचीही चौकशी करण्यात येणार आहे.

अभिनेत्याच्या फोन इतिहासाचीही चौकशी केली जात आहे. अनेक संपर्कांना फोन करूनही माहिती विचारली जात आहे, मात्र दिल्ली किंवा मुंबई पोलिसांनी आणि गुरुचरण यांच्या निकटवर्तीयांकडून याबाबत कोणतीही पुष्टी करण्यात आलेली नाही.

‘TMKOC’ मधील लोकप्रिय अभिनेता रोशनसिंग सोधी 4 दिवसांपासून बेपत्ता, वडिल म्हणाले, ‘तो….’

गुरुचरण हे तारक मेहताच्या टीमच्या संपर्कात नव्हते

गुरुचरण सिंग यांच्या ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतील कलाकारांपैकी कोणाशीही गेल्या 2-3 महिन्यांपासून संपर्कात नव्हते. एका अभिनेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर माहिती सांगितली आहे की, त्यांच्या म्हणण्यानुसार, या दोन-तीन महिन्यांमध्ये जेव्हा जेव्हा ‘तारक मेहता का…’च्या टीममधील काही अभिनेत्या मित्रांनी गुरुचरण सिंग यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांना फक्त फोनची रिंग ऐकू यायची. मात्र, गुरुचरणकडून त्यांना कोणताही कॉलबॅक आला नाही. अखेर काही लोकांनी वैतागून त्याला फोन करणे बंद केले.

follow us