Khushi Kapoor चा आई श्रीदेवीला अनोखा ट्रीब्युट; अर्चिजच्या प्रीमिअरला परिधान केला ‘तो’ ड्रेस

Khushi Kapoor चा आई श्रीदेवीला अनोखा ट्रीब्युट; अर्चिजच्या प्रीमिअरला परिधान केला ‘तो’ ड्रेस

Khushi Kapoor : श्रीदेवीची लहान मुलगी खुशी कपूर (Khushi Kapoor) देखील चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करत आहे. द अर्चिज या चित्रपटातून ती प्रेक्षाकांच्या पहिल्यांदाच भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा प्रीमिअर नुकताच पार पडला. यावेळी खुशीने आपली आई आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीला अनोखाा ट्रिब्युट दिला आहे. त्यामुळे श्रीदेवीच्या आठवणींना पुन्हा उजाळा मिळाला आहे.

अर्चिजच्या प्रीमिअरला परिधान केला ‘तो’ ड्रेस

अर्चिज हा चित्रपट लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. त्यापूर्वी या चित्रपटाचा प्रीमिअर सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला अनेक सेलिब्रेंटींनी गर्दी केली होती. तर हा चित्रपट म्हणजे अनेक स्टार किड्सचं चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करणारा चित्रपट आहे. त्यामध्ये शाहरूख खानची मुलगी सुहाना खान, श्रीदेवीची लहान मुलगी खुशी कपूर आणि अमिताभ बच्चन यांची नातू अगस्त्य नंदा यांच्या नावाचा समावेश आहे. ‘ इतरही काहीजण आहेत. तर अर्चिजच्या प्रीमिअरच्या वेळी खुशीने आई श्रीदेवीला ट्रिब्युट दिला आहे. तिने यावेळी श्रीदेवीचा आयकॉनिक गाऊन घातला होता.

TMKOC: ‘जेठालाल दयाबेनला घटस्फोट देणार का?’ अभिनेत्याने केला खुलासा

यावेळी तिने तिच्या भावना व्यक्त केल्या. ती म्हणाली की, आईला ट्रीब्युट देताना मला आनंद होत आहे. तसेच आईने घातलेला गाऊन घालणे माझ्यासाठी जास्त आनंद देणारं आहे. त्याचबरोबर यावेळी तिने श्रीदेवीची ज्वेलरी देखील घातली होती. या सर्व पेहरावामध्ये ती रेड कार्पेट गाजवत होती. तसेच आईच्या आठवणींना उजाळा देत तिने या पदार्पणाला आणखी भावनिक केले होते.

Solapur News : तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्याकडे 5.85 कोटींचं घबाड; पत्नी-मुलावरही गुन्हा दाखल

‘द आर्चिज’चे दिग्दर्शन झोया अख्तरने केले आहे. हा चित्रपट ‘द आर्चीज’ या कॉमिक बुकवर आधारित आहे. द आर्चीज’चा ट्रेलरमध्ये मैत्री आणि रोमान्स बघायला मिळत आहे. ट्रेलरमध्ये 60 च्या दशकाच्या रिव्हरडेलमध्ये घेऊन जातो जेथे किशोर आर्ची अँड्र्यूज (ऑगस्ट नंदा), बेट्टी कपूर (खुशी कपूर), वेरोनिका लॉज (सुहाना खान), जुगहेड, डिल्टन, एथेल, मूस आणि इतर अनेकजण आपला वेळ स्केटिंग, नृत्य करताना दिसतात. ट्रेलरमध्ये आर्टी, बेट्टी आणि वेरोनिका यांच्यातील प्रेमाचा त्रिकोट बघायला मिळत आहे. हिल स्टेशनवरील या सर्व मित्रांचे आनंदी जीवन बदलते. वेरोनिकाच्या वडिलांनी आपला व्यवसाय वाढवण्यासाठी ग्रीन पार्कवर एक भव्य हॉटेल बांधण्याचा निर्णय घेतात. यानंतर ‘द आर्चिज’ टीम ते उद्यान वाचवण्यासाठी धडपडते. हा चित्रपट 7 डिसेंबरला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube