TMKOC: ‘जेठालाल दयाबेनला घटस्फोट देणार का?’ अभिनेत्याने केला खुलासा

TMKOC: ‘जेठालाल दयाबेनला घटस्फोट देणार का?’ अभिनेत्याने केला खुलासा

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मध्ये (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) सध्या हाय व्होल्टेज ड्रामा सुरू आहे. दयाबेन या दिवाळीत शोमध्ये परतणार अशा बातम्या आल्या होत्या. (TMKOC) मात्र असं काही झालं नाही. दयाबेन अजून शोमध्ये परतलेली नाही. दयाबेन (Daya )न आल्याने जेठालाल (Jethalal ) खूप उदास आहे आणि तो सुंदरवरही भडकला आहे.


दयाबेनने ऑडिओ मेसेज पाठवला…

शोमध्ये दयाबेनने सुंदरसोबत एक दिवा पाठवला आहे. बापूजी, टपू आणि जेठालाल मंदिरात लावत दिवाळीची पूजा करत आहेत. यानंतर सुंदरने सांगितले की, दया यांनी एक ऑडिओ मेसेज पाठवला आहे. हे ऐकून जेठालाल खूप आनंदी होतो. ऑडिओमध्ये दयाबेनने जेठालालची माफी मागितली, ती दिवाळीला घरी येऊ शकली नाही. दया म्हणते की तिला त्याच्या भावना समजतात आणि तिला परत यायचे आहे. मात्र, तिची आई तिला थांबवत आहे आणि त्यामुळेच ती येऊ शकत नाही. दयाबेनने जेठालाल आणि सर्वांना शुभेच्छा देत आहे आणि लवकरच गोकुलधाम सोसायटीत परत येण्याचे वचन दिले आहे.

जेठालाल दयाला घटस्फोट देणार का?

बापूजी, जेठालाल आणि टपू सुंदरसोबत गोकुळधाम सोसायटी कंपाउंडमध्ये जातात. जेठालाल सुंदरला विचारतो की, दया कधी येणार आहे. यामुळे जानेवारी 2024 मध्ये दया येणार असल्याचे सुंदरचे म्हणणे आहे. जानेवारी 2024 मध्ये दया यावी यासाठी तो सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. यानंतर जेठालालला खूप राग येतो आणि तो म्हणतो की, जर दया जानेवारी 2024 मध्ये आली नाही तर तो दयाला घटस्फोट देईल. हे ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.

TMKOC: ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ शो बंद होणार? निर्माते असित मोदींनी अखेर सांगितले सत्य

सुंदर जेठालालला असे निर्णय घेऊ नका असे सांगत आहे. मग जेठालाल म्हणतो की, दया भेटून खूप दिवस झाले. आणि जर दया आता परत आला नाही तर तो दयापासून विभक्त होणार आहे. त्यानंतर सुंदर जेठालालला वचन देतो की, तो जानेवारीत दया घेऊन परतणार. मग टपूही सुंदरला सांगतो की तू तुझे वचन नक्की पूर्ण करशील ना. आता या शोमध्ये येत्या काही दिवसांत नवनवीन ट्विस्ट येणार आहे.

परंतु गेल्या काही वर्षांपासून दया बेन शोमध्ये दिसली नाही आणि चाहते तिला मिस करत आहेत. मात्र अलीकडेच दयाबेन शोमध्ये परतणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या. परंतु पुन्हा दयाबेन शोमध्ये परतल्या नाहीत, त्यानंतर प्रेक्षक नाराज झाले आणि शोवर बंद करण्याचा इशारा दिला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube