TMKOC: ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ शो बंद होणार? निर्माते असित मोदींनी अखेर सांगितले सत्य

TMKOC: ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ शो बंद होणार? निर्माते असित मोदींनी अखेर सांगितले सत्य

TMKOC: ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta ka ooltah chashmah) ही मालिका गेल्या 15 वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. मात्र या शोबाबत काही दिवसांपासून जोरदार वाद सुरू आहेत. दयाबेनला परत न आल्यामुळे प्रेक्षकांनी शोवर बंद करण्याचा सल्ला दिला आहे.

त्यानंतर ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ शो बंद होऊ शकतो, अशी चर्चा जोरदार रंगत होती. मात्र आता निर्माते असित मोदींनी शो बाबत अखेर सत्य सांगितले आहे. या सगळ्यात असित मोदींची (Asit Modi) प्रतिक्रिया समोर आली आहे. एका मुलाखतीत शो बंद झाल्याच्या वृत्तावर त्यांनी मौन सोडले आहे.


असित मोदींनी सांगितले सत्य

असित मोदी यांनी दिलेल्या मुलाखतीत या वादावर चर्चा केली. यावेळी त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे की, हा शो बंद होणार नाही आणि ही केवळ अफवा आहे. यादरम्यान दयाबेनच्या परतण्याबाबत त्यांनी सांगितले आहे. दयाबेनच्या पात्राचा शोध सुरू आहे. कोणीतरी कलाकार दयाबेनच्या भूमिकेसाठी सापडताच ही भूमिका मालिकेत परत आणण्यात येईल.”

दयाबेनच्या पुनरागमनावर असित मोदी काय म्हणाले?

असित मोदी म्हणाले- मी माझ्या प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी आलो आहे आणि त्यांच्याशी खोटे बोलण्यासाठी नाही. काही अडचणींमुळे आम्ही दयाबेनचे पात्र परत आणू शकलो नाही. याचा अर्थ असा नाही की आम्ही दयाबेनचे पात्र पुन्हा शोमध्ये आणणार नाही. आता दिशा वकानी दयाबेनची भूमिका साकारणार असून तिची जागा दुसरी कोणी घेणार का? हे लवकरच आपल्याला माहिती होईल. पण मी वचन देतो की दयाबेनची व्यक्तिरेखा शोमध्ये नक्कीच परत येईल.

TMKOC: ‘बंद करा हा शो..’ ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’चा नवा प्रोमो पाहून प्रेक्षक संतापले

परंतु गेल्या काही वर्षांपासून दया बेन शोमध्ये दिसली नाही आणि चाहते तिला मिस करत आहेत. मात्र अलीकडेच दयाबेन शोमध्ये परतणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या. परंतु पुन्हा दयाबेन शोमध्ये परतल्या नाहीत, त्यानंतर प्रेक्षक नाराज झाले आणि शोवर बंद करण्याचा इशारा दिला. अभिनेत्री दिशा वकानी शोच्या सुरुवातीपासूनच दयाबेनची भूमिका साकारत होती.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube