TMKOC निर्माता असित मोदीविरुद्ध FIR, नेमके काय आहे प्रकरण?
TMKOC Producer Asit Modi : ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या सिरियलचे निर्माते असित मोदी (Asit Modi) यांच्या विरोधामध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (TMKOC) ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या सिरियलमध्ये काम करणाऱ्या एका अभिनेत्रीने सिरियलचे निर्माते आणि ऑपरेशनल हेड यांच्या विरोधामध्ये मध्यरात्री पवई पोलीस स्टेशनमध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Mumbai, Maharashtra | Powai Police has registered a case against Taarak Mehta Ka Ooltah Chashmah producer Asit Modi, operation head Sohail Ramani, and executive producer Jatin Bajaj under sections 354 and 509 of the IPC based on a complaint by an actor of the show. No arrests…
— ANI (@ANI) June 20, 2023
‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या सिरियलमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत असणाऱ्या एका अभिनेत्रीने असित मोदी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. (FIR on Asit Modi) अभिनेत्रीने सिरियलच्या निर्मात्यांवर लैंगिक छळाचा आरोप करण्यात आला होता. ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या सिरियलचे निर्माते असित मोदी आणि एग्जीक्यूटिव्ह निर्माते जतीन बजाज आणि त्यांचे साथीदार ऑपरेशनल हेड सोहेल रमानी यांच्याकडून महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप अभिनेत्रीने लावला आहे.
नेमकं काय आहे प्रकरण
गोरेगाव फिल्मसिटी आणि सिंगापूरमध्ये सिरियलच्या शूटिंगच्या दरम्यान अभिनेत्रीचा विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. आता अभिनेत्रीच्या तक्रारीची दखल घेत ३ जणांविरोधात कलम ३५४, ५०९चा अंतर्गत पवई पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पवई पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
Manoj Muntashir: ‘आदिपुरुष’ सिनेमाचे संवाद लेखक मनोज मुंतशीर यांना मुंबई पोलिसांनी दिली सुरक्षा
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या सिरियलमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत असणाऱ्या अभिनेत्रीने मालिकेचे निर्माते असित मोदी, प्रोजेक्ट हेड सोहिल रमानी आणि एग्झीक्युटिव्ह निर्माते जतिन बजाज यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप लावला आहे. ७ मार्चला अभिनेत्रीच्या लग्नाचा वाढदिवस होता. त्यावेळी तिने लवकर घरी जाण्यासाठी विचारले असता, तिला अपमानास्पद वागणूक दिली होती. तसेच जबरदस्तीने सेटवर थांबण्यासाठी तिला धमक्या देण्यात आल्या होत्या. अभिनेत्रीने ३ महिन्याअगोदरच ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही सिरियल सोडली आहे. ७ मार्च २०२३ रोजी तिने शेवटचा एपिसोड शूट केला आहे.