शिक्षण खात्यातील काळा दिवस! तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्याकडे 5.85 कोटींचं घबाड; गुन्हा दाखल

शिक्षण खात्यातील काळा दिवस! तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्याकडे 5.85 कोटींचं घबाड; गुन्हा दाखल

Solapur News : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत शिक्षण विभागातील अधिकाऱ्याच्या अपसंपदेचा छडा लावला आहे. सोलापूर (Solapur News) जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षण विभागाचे तत्कालीन शिक्षणाधिकारी (Education Officer) किरण लोहार यांच्याकडे तब्बल 5 कोटी 85 लाख 85 हजार रुपयांची अपसंपदा आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी किरण लोहारसर त्याची पत्नी आणि मुलाविरोधात सोलापुरातील (Solapur) सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक यांनी फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईनंतर राज्याच्या शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

Solapur News : पुलावरून पडून 12 काळविटांचा मृत्यू

सोलापूर जिल्हा परिषदेतील तत्कालीन प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण अनंत लोहार, पत्नी सुजाता किरण लोहार आणि मुलगा निखिल किरण लोहार (Nikhil Lohar) (सर्व रा. आकांक्षा शिक्षक कॉलनी, पाचगाव ता. करवीर जि. कोल्हापूर) या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तत्कालीन शिक्षणाधिकारी किरण लोहार (Kiran Lohar) शिक्षण विभागात कर्तव्य बजावत असतानाही त्यांचा कार्यकाळ नेहमीच वादग्रस्त राहिला. त्याच्या चौकशीनंतर त्यांच्याकडे उत्पन्नाच्या स्त्रोतापेक्षा 111.93 टक्के जास्त संपत्ती आढळून आली. त्यांचा अपसंपदा कालावधी 15 नोव्हेंबर 1993 ते 31 ऑक्टोबर 2022 असा असून त्यांच्याकडे एकूण 5 कोटी 85 लाख रुपयांपेक्षा जास्त अपसंपदा असल्याचे आढळून आले आहे.

Solapur News : लग्नाळूंची ‘अशी’ झाली फसवणूक; महिलेसह अनेकजण ताब्यात

लोहारने ही संपत्ती भ्रष्ट (Corruption) व गैरमार्गाने गोळा केली आहे. इतकेच नाही तर त्यांची पत्नी आणि मुलानेही या कामात त्यांना मदत केल्याचे चौकशीत समोर आले आहे. त्यामुळे पोलिसांनी या दोघांविरोधातही गु्न्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक यांनी केला. यानंतर त्यांनी दाखल केलेल्या फिर्यादीत किरण लोहार यांच्याकडे 5.85 कोटी रुपयांची अपसंपदा आढळून आली. पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक यांच्याकडे या प्रकरणाचा तपास आहे. उपअधीक्षक गणेश कुंभार यांच्या नेतृत्वात आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube