TMKOC: ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) सध्या एका कारणांमुळे जोरदार चर्चेत येत आहे. या मालिकेमध्ये ‘मिसेस रोशन सिंह सोढी’ (Roshan Singh Sodhi) ही भूमिका साकारणाऱ्या जेनिफर मिस्त्री बन्सीवालने निर्मात्यांवर गंभीर आरोप केले आहेत. मात्र निर्माते असित मोदी (Produced Asit Modi) यांनी हे आरोप फेटाळून लावले होते. मार्च महिन्यामध्ये तिने हा कार्यक्रम सोडला आहे. यानंतर तिची आर्थिक परिस्थिती कशी होती याचा मोठा खुलासा अभिनेत्रीने केले आहे.
जेनिफरने मार्च महिन्यामध्ये हा कार्यक्रम सोडला, तेव्हा मिळणार पगार हा बाकी होता. याबाबत जेनिफर मिस्त्री बन्सीवाल सांगितले आहे की, जेव्हा मी हा कार्यक्रम सोडला तेव्हा मी निर्मात्यांकडे माझ्या कामाचे पैसे मागणार नाही असं मी ठरवलं होते. परंतु माझं साडेतीन महिन्याची पगार येणं बाकी होतं आणि ती रक्कम खूप मोठी होती. हा कार्यक्रम सोडला तेव्हा माझ्या खात्यामध्ये एक लाखही रक्कम शिल्लक नव्हती.
तसेच पुढे ती म्हणाली आहे की, माझ्या माहेरी ७ मुली देखील आहेत आणि त्या सर्वांची काळजी माझ्यावरी आहे. पण कठीण प्रसंगांमध्ये देव आपल्याला मदत करत असतो, यावर माझा विश्वास आहे. माझ्या खात्यामध्ये ८० हजार रुपये आहेत याचा मी का विचार करू? मी का घाबरू? देवाने जर मला तोंड दिले आहे, तर मला अन्न देखील तोच देईल. देवाने मला आतापर्यंत सतत काहींना काही मार्ग दाखवला आहे. यामुळे मी घाबरत नाही. जेनिफर सध्या मुंबईबाहेर असल्याचे स्पष्ट केलं आहे.
Adipurush: ‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या वादात अभिनेता प्रभासच्या पोस्टरनं वेधलं लक्ष
एफआयआरविषयी माहिती घेण्यासाठी मुंबई पोलिसांचे तिला फोन येत आहेत, असे देखील टीईने यावेळी सांगितले आहे. सुरुवातीला लैंगिक अत्याचार हा शब्द वापरण्यासाठी ती साशंक होती, असा खुलासा देखील अभिनेत्रीने यावेळी केला आहे. असितजी यांनी माझ्यासोबत लैंगिक संबंध बनवायचा प्रयत्न केला, अशा बातम्या जे देत आहेत, त्या सगळ्या खोट्या आहेत. असितजी यांनी फक्त लैंगिक टिप्पणी केली होती. यामुळे विनाकारण कोणाचीही प्रतिमा मलिन करू नका आणि केवळ खरी माहितीच समोर येऊ द्या, असं तिने या स्पष्टीकरण दिले आहे.