Union Budget 2023-24 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी आज २०२३-२४ साठी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यावेळी निर्मला सीतारमण यांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत.
अर्थसंकल्पावर वेगवेळ्या अनेक प्रतिक्रिया येत आहेत. त्यातच अभिनेता स्वप्नीज जोशी याने एक ट्विट केले आहे. ट्विटमध्ये स्वप्नील जोशी म्हणला आहे की, “आज सगळेच experts आहेत !” त्यासोबत त्याने #Budget हा हॅशटॅगही वापरला आहे.
….आज सगळेच experts आहेत ! #Budget
— Swwapnil Joshi | स्वप्नील जोशी (@swwapniljoshi) February 1, 2023
त्यावर अनेक नेटकऱ्यानी प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यामध्ये राजेंद्र गांगण या नावाच्या युजरने “त्यातले किमान ९० टक्के लोक आयकर भरत नसतील” अशी कमेंट केली आहे.
त्यातले किमान 90 टक्के आयकर भरत नसतील… 😄😄
— राजेंद्र अनंत गांगण (@rajengangan) February 1, 2023
दरम्यान केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी २०२३-२४ चा अर्थसंकल्प सादर केला. मोदी सरकार २.० चा हा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प होता. पुढील वर्षाचा अर्थसंकल्प हा अंतरिम अर्थसंकल्प असणार आहे.या अर्थसंकल्पात निर्मला सीतारमण यांनी मोठी घोषणा केली आहे. ७ लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करणार आहे, अशी माहिती निर्मला सीतारमण यांनी केली.