Naad Movie Trailer Released: मराठी चित्रपटांची परंपरा खऱ्या अर्थाने जपत रसिकांचे परिपूर्ण मनोरंजन करणारा ‘नाद – द हार्ड लव्ह’ हा मराठी (Naad Movie Trailer) चित्रपट 25 ऑक्टोबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात काय पाहायला मिळणार याची चुणूक दाखवणाऱ्या टिझरनंतर रिलीज झालेल्या अॅक्शनपॅक्ड ट्रेलरने खऱ्या अर्थाने लक्ष वेधण्याचे काम केले आहे. (Marathi Movie) अलिकडच्या काळात मराठी सिनेसृष्टीत बनणाऱ्या विविधांगी आणि नावीन्यपूर्ण चित्रपटांपैकी एक असलेल्या ‘नाद – द हार्ड लव्ह’च्या ट्रेलरवर राज्यभरातून प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया उमटत आहेत. (Kiran Gaikwad) चित्रपटाच्या टॅगलाईनसारखाच ट्रेलरही ‘हार्ड’ असल्याची चर्चा नेटकऱ्यांमध्ये सुरू आहे.
निर्माते संजय पगारे आणि रुपेश दिनकर यांनी शकुंतला क्रिएशन प्रोडक्शन आणि जिजाऊ क्रिएशन मेकरच्या बॅनरखाली ‘नाद – द हार्ड लव्ह’ चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाचे निर्मिती व्यवस्थापक रुपाली दिपक पवार आणि वैशाली नितीन पवार आहेत. प्रकाश जनार्दन पवार यांनी ‘नाद’चं दिग्दर्शन केलं आहे. ‘नाद’ची कथा संतोष दाभोळकर आणि दिपक पवार यांनी लिहिली असून, डॉ. विनायक पवार यांनी पटकथा व संवादलेखन केलं आहे. ‘नाद’ची व्याख्या सांगत टिझर प्रदर्शित झाल्यानंतर अॅक्शनचा धमाका असलेला ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. ‘नाद – द हार्ड लव्ह’ हा चित्रपट शीर्षकाप्रमाणेच एक हार्ड लव्हस्टोरी सांगणारा आहे. प्रसंगानुरूप असलेले दमदार आणि रोमँटिक संवाद ट्रेलरमध्ये आहेत. या जोडीला हिंदी आणि दक्षिणात्य चित्रपटांमध्येही आजवर पाहायला मिळाले नसतील अशी लाल मातीतील अॅक्शन दृश्ये नजर खिळवून ठेवतात. गाण्यांची झलक ट्रेलरमध्ये आहेच, पण रोमँटिक दृश्येही लक्ष वेधतात. प्रेम म्हणजे नेमकं काय? हे आजवर कोणीही सांगू शकलेले नाही.
आजतागायत बऱ्याच दिग्दर्शकांनी प्रेमाचे विविध पैलू रूपेरी पडद्यावर सादर करण्याचा प्रयत्न केला आहे. ‘नाद – द हार्ड लव्ह’ या चित्रपटात हार्ड लव्ह म्हणजेच खरंखुरं प्रेम काय असतं ते पाहायला मिळणार आहे. आतापर्यंत कधीही न उलगडलेल्या प्रेमाच्या पैलूंसोबतच प्रेमाच्या गुलाबी रंगांमधीलही विविधांगी छटा यात बघायला मिळतील. ट्रेलरबाबत दिग्दर्शक जनार्दन पवार म्हणाले की, ‘नाद – द हार्ड लव्ह’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून रसिकांचे लक्ष वेधत असल्याचा खूप आनंद आहे. हे आमच्या संपूर्ण टिमचे श्रेय आहे. असाच प्रतिसाद चित्रपटगृहांमध्येही मिळेल याची खात्री आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून एक संगीप्रधान अॅक्शनपॅक्ड प्रेमकथा रसिक दरबारी सादर करण्यात आली आहे. कोणत्याही वयोगटातील प्रेक्षक कुटुंबासोबत पाहू शकतील असा दर्जेदार चित्रपट तयार केला असून, त्याची झलक ट्रेलरमध्ये पाहायला मिळत असल्याचेही पवार म्हणाले.
Naad Movie: रोमँटिक-ऍक्शन लव्हस्टोरी ‘नाद’चे कडक मोशन पोस्टर प्रदर्शित
‘देवमाणूस’ फेम किरण गायकवाड या चित्रपटात नायकाच्या भूमिकेत असून, त्याचे आजवर कधीही समोर न आलेले रांगडे रूप यात पाहायला मिळणार आहे. किरणच्या जोडीला सपना माने हि नवोदित अभिनेत्री असल्याने नव्या कोऱ्या जोडीची अनोखी केमिस्ट्रीही लक्षवेधी ठरणार आहे. या दोघांच्या जोडीला यशराज डिंबळे, तानाजी गालगुंडे, किरण माने, विजय पाटकर, जयवंत वाडकर, कमलेश सावंत, टिशा संजय पगारे, सूरज पवार, विनायक पवार, श्रीकांत गायकवाड, गणेश पदमाळे, आशिष वारंग, ईश्वर सातलिंग बोरामणी आदी कलाकारांच्याही भूमिका आहेत. गीतकार वैभव देशमुख आणि विनायक पवार यांच्या लेखणीतून अवतरलेली गाणी सुप्रसिद्ध संगीतकार पंकज पडघन यांनी संगीतबद्ध केली आहेत. सिनेमॅटोग्राफर अमित सिंह यांनी सिनेमॅटोग्राफी केली असून, कला दिग्दर्शन सतीश चिपकर यांचे आहे. वेशभूषा निगार शेख यांनी केली असून, कोरिओग्राफी सिद्धेश दळवीने केली आहे. या चित्रपटाचे कास्टिंग डायरेक्टर रमेश शेट्टी, तर आमिरा शेख क्रिएटिव्ह हेड आहेत. लाइन प्रोड्युसर संकेत चव्हाण असून, सुजित मुकटे कार्यकारी निर्माते आहेत.