Do Deewane Sehar Mein : बहुप्रतीक्षित चित्रपट ‘दो दीवाने सहर में’ चा ट्रेलर अखेर प्रदर्शित

Do Deewane Seher Mein : झी स्टुडिओज आणि भन्साली प्रोडक्शन्सची बहुप्रतीक्षित चित्रपट ‘दो दीवाने सहर में’ चा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे.

Do Deewane Seher Mein

Do Deewane Seher Mein

Do Deewane Seher Mein : झी स्टुडिओज आणि भन्साली प्रोडक्शन्सची बहुप्रतीक्षित चित्रपट ‘दो दीवाने सहर में’ चा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे. भावनिक आणि वास्तवाची झलक देणाऱ्या टीझरनंतर आता सिद्धांत चतुर्वेदी आणि मृणाल ठाकूर अभिनीत या चित्रपटाचा ट्रेलर प्रेमकथेची आणखी खोल बाजू उघडते आहे. ही एक अशी मॉडर्न लव्ह स्टोरी आहे जी परिपूर्णतेच्या मागे न धावता, भावना जशाच्या तशा प्रामाणिकपणे मांडते.

मृणाल ठाकूर आणि सिद्धांत चतुर्वेदी यांची ही प्रेमकहाणी परीकथेसारखी न वाटता, आयुष्यातील एका खऱ्या प्रवासासारखी सादर होते. थोडीशी गुंतागुंतीची, नाजूक आणि हळूहळू बदलणारी. धावपळीच्या शहराच्या पार्श्वभूमीवर ट्रेलर दोन अशा व्यक्तींना भेट घडवतो, ज्या एकमेकांना “पूर्ण” करण्यापेक्षा समजून घेण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या नात्याची वाढ शांततेतून, छोट्या नजरेतून, अपूर्ण संवादांतून आणि असे निर्णय घेण्यातून होते, जे मनावर दीर्घकाळ ठसा उमटवतात.

सोशल मीडियावर ट्रेलर शेअर करताना निर्मात्यांनी लिहिले, ट्रेलरमध्ये सिद्धांत चतुर्वेदी आणि मृणाल ठाकूर यांची केमिस्ट्री अतिशय सहज आणि हृदयस्पर्शी वाटते. दोघेही असे पात्र साकारताना दिसतात, जे स्वतःलाच समजून घेण्याच्या प्रक्रियेत आहेत आणि प्रेमकथांमध्ये अशी प्रामाणिक मांडणी क्वचितच पाहायला मिळते.

सेटलमेंट नंतरचा पार्ट पहिले…; दादांच्या खास राहिलेल्या आमदारानं पवारांना दिला युतीचा ‘रोड मॅप’

खरी प्रेमाची आणि भावनिक कनेक्ट दाखवणारी ही जोडी यंदाच्या सर्वात लक्षवेधी ऑन-स्क्रीन जोड्यांपैकी एक ठरण्याची शक्यता आहे. झी स्टुडिओज आणि भन्साली प्रोडक्शन्स प्रस्तुत ‘दो दीवाने सहर में’ या चित्रपटात मृणाल ठाकूर आणि सिद्धांत चतुर्वेदी प्रमुख भूमिकेत आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन रवि उद्यावर यांनी केले असून, संजय लीला भन्साली, प्रेरणा सिंह, उमेश कुमार बंसल आणि भारत कुमार रंगा यांनी रवि उद्यावर फिल्म्ससोबत मिळून या चित्रपटाची निर्मिती केली आहे. व्हॅलेंटाईन वीकच्या आसपास प्रदर्शित होणारा हा चित्रपट 20 फेब्रुवारी 2026 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

Exit mobile version