Kushi Movie Traile: कुशी सिनेमाचा ट्रेलर ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित, सोशल मीडियावर शेअर केला पोस्टर

Kushi Movie Traile: साउथ फिल्म इंडस्ट्रीतील सुपरहिट हसिना समंथा रुथ प्रभू (Samantha Prabhu) आणि दक्षिणेतील स्टार विजय देवरकोंडा (Vijay Devarkonda) स्टारर बहुप्रतिक्षित लव्हस्टोरी फिल्म ‘खुशी’ (Kushi) बद्दल एक मोठे अपडेट समोर आले आहे. चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. आतापर्यंत या चित्रपटाचे अनेक पोस्टर्स आणि गाणी रिलीज झाली आहेत.   View this post on […]

Kushi Movie Trail

Kushi Movie Trail

Kushi Movie Traile: साउथ फिल्म इंडस्ट्रीतील सुपरहिट हसिना समंथा रुथ प्रभू (Samantha Prabhu) आणि दक्षिणेतील स्टार विजय देवरकोंडा (Vijay Devarkonda) स्टारर बहुप्रतिक्षित लव्हस्टोरी फिल्म ‘खुशी’ (Kushi) बद्दल एक मोठे अपडेट समोर आले आहे. चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. आतापर्यंत या चित्रपटाचे अनेक पोस्टर्स आणि गाणी रिलीज झाली आहेत.


आता निर्मात्यांनी चित्रपटातील विजय आणि सामंथाचा रोमँटिक फोटो शेअर करून चित्रपटाच्या ट्रेलरच्या रिलीजची तारीख जाहीर केली आहे. हे पोस्टर विजयने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरही शेअर केले आहे. चित्रपटाचा ट्रेलर किती मिनिटांचा आहे हे देखील अभिनेत्याने सांगितले आहे. तेलगू भाषेतील हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार आहे आणि या चित्रपटाचा ट्रेलर कधी येणार आहे.

खुशीचा ट्रेलर कधी रिलीज होणार?
विजयने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्याची सहकलाकार समंथा रुथ प्रभूसोबतचा एक रोमँटिक आणि मोहक फोटो शेअर केला आहे आणि लिहिले आहे की, “लो आ गये, चित्रपटाचा खुशी ट्रेलर ९ ऑगस्ट रोजी रिलीज होत आहे. चित्रपटाचा ट्रेलर 2.41 मिनिटांचा आहे. यावर त्याने सांगितले आहे की, हा चित्रपट 1 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

Box Office Collection: Ranveer-Aliaच्या ‘रॉकी ओर रानी की प्रेमकहानी’ने केला 100 कोटींचा आकडा पार

खुशी या चित्रपटाचे दिग्दर्शन शिव निर्वाण यांनी केले आहे. चित्रपटाच्या कथेबद्दल सांगायचे झाले तर हा एक आर्मी ऑफिसर (विजय देवरकोंडा) आणि एक काश्मिरी मुलगी (सामंथा) यांच्यातील प्रेमकथा असल्याचे पाहायला मिळणार आहे. नवीन येरनानी आणि वाय रविशंकर हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. या चित्रपटाची निर्मिती मैत्री मुव्ही मेकर्सने केली आहे. या चित्रपटात विजय आणि सामंथा यांच्यासोबत जयराम, वेनेला किशोरर आणि सचिन खेडकर यांसारखे दिग्गज कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

Exit mobile version