Tujhi Majhi Jodi Jamli Song From Phakaat: 80 च्या दशकामधील सुपरहीट गाणं ‘तुझी माझी जोडी जमली’ चा (Tujhi Majhi Jodi Jamli Song) नवा अंदाज ‘फकाट’ (Phakaat) या सिनेमामध्ये दिसणार आहे. सध्या बॉलिवूडमध्ये असलेला या जुन्या गाण्याला नव्या अंदाजामध्ये ट्रेंड मराठीमध्ये करण्यात आला आहे.
‘तुझी माझी जोडी जमली’ हे मूळ गाण ‘माझा पती करोडपती’ मध्ये अशोक सराफ (Ashok Saraf) आणि किशोरी शहाणे यांच्यावर चित्रित झाले होते. पण आता नव्याने फकाटमध्ये अनुजा साठे आणि हेमंत ढोमे या गाण्यावर थिरकणार आहेत. ‘ट्रिनिटी ब्रदर्स’ने नवं गाणं संगीतबद्ध केले आहे. या चित्रपटातील जबरदस्त गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.
‘तुझी माझी जोडी’ असे गाण्याचे बोल असणाऱ्या हर्षवर्धन वावरे आणि कस्तुरी वावरे यांनी गायले असून शांताराम नांदगावकर आणि हर्ष, करण, आदित्य या ‘ट्रिनिटी ब्रदर्स’ यांनी या गाण्याला शब्दबद्ध केले आहे. तर या गाण्याला ‘ट्रिनिटी ब्रदर्स’चेच संगीत लाभले आहे. हेमंत ढोमे आणि अनुजा साठे यांच्यावर चित्रित करण्यात आलेले हे गाणे ऐंशीच्या दशकात नेणारे आहे. हे रेट्रो लूकमधील गाणे बघताना आणि ऐकताना संगीतप्रेमींना त्याच काळात गेल्याचा अनुभव येईल.
या गाण्याबद्दल ट्रिनिटी ब्रदर्स यांनी सांगितले आहे की, “अनेक जुनी गाणी पुनर्रचित करून, ती नव्याने प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचे सध्या फॅड आहे. आम्हीही या गाण्यातून प्रयत्न केला आहे. परंतु यात आम्ही या गाण्याला नवीन स्वरूपात न आणता अगदी जसेच्या तसे समोर आणले आहे, अगदी कलाकारांचे नृत्य, पेहरावही तसेच आहे. अर्थात काही छोटे बदल आहेत, जे प्रेक्षकांना दिसतीलच. रेट्रो फील देण्याचा आमचा हा प्रयत्न प्रेक्षकांना नक्कीच आवडणार आहे.