Allu Ramesh Passed Away: अभिनेते अल्लू रमेश यांचे 52 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन; तेलुगू चित्रपटसृष्टी शोकाकूल

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 19T134935.548

Allu Ramesh Passed Away: तेलुगू सिनेमासृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता अल्लू रमेश (Allu Ramesh) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. वयाच्या 52 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.अल्लू रमेश यांच्या निधनामुळे तेलुगू सिनेमासृष्टीमध्ये मोठी शोककळा पसरली आहे. अल्लू रमेशच्या निधनानंतर सर्व सेलिब्रिटी आणि त्यांच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर शोक व्यक्त केला आहे.

तेलुगू सिनेमा निर्माते आनंद रवी (Anand Ravi) यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन याबद्दल माहिती दिली आहे. आनंद रवी यांनी सोशल मीडियावर दिवंगत अल्लू रमेश यांच्याबरोबरचा एक फोटो शेअर करत त्यांनी याबद्दल माहिती दिली आहे. तसेच त्यांनी लिहिलं आहे, ‘तुम्ही माझा सर्वात मोठा आधार होता. अजूनही माझ्या हृदयात आणि मनात तुमचा आवाज ऐकू शकतो. मिस यू ओम शांती.’


अल्लू रमेश यांचे चित्रपट
अल्लू रमेश यांनी सिनेमासृष्टीत आपल्या करिअरची सुरुवात थिएटर क्षेत्रामधून केली आहे. अल्लू रमेश यांनी आपल्या विनोदी भूमिकांनी चाहत्यांची मनं जिंकली होती.त्यांनी २००१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘चिरुजल्लू’ सिनेमातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी ‘टोलू बोम्मलता’, ‘मथुरा वाइन’, ‘वेधी’, ‘ब्लेड’ ‘बाबजी आणि नेपोलियन’ यांसारख्या अनेक सिनेमामध्ये काम केले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube