Download App

किंग खानसोबत शूटिंग करताना उपाशी राहिलेली ट्विंकल खन्ना; म्हणाली, ‘पोट सपाट दिसण्यासाठी….’

Twinkle Khanna Birthday: बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री ट्विंकल खन्ना (Twinkle Khanna) आता चित्रपटांमध्ये दिसत नसली तरी ती अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. कधी काही वादामुळे तर कधी तिच्या पुस्तकाच्या लाँचमुळे. अशा परिस्थितीत आज ती तिचा 49 वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने तिच्या आणि शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) चित्रपटाशी संबंधित एक रंजक किस्सा घडला होता. एका गाण्याच्या शूटिंगसाठी ती आठवडाभर उपाशी होती. स्वतःला फिट करण्यासाठी, तिने आठवडाभर भाजलेले हरभरे खाल्ले असल्याचा तो किस्सा खूपच चर्चेत आला होता.


29 डिसेंबर 1974 रोजी मुंबईत जन्मलेल्या ट्विंकल खन्ना बद्दल सर्वांना माहिती आहे की ती राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया यांची मुलगी आहे. ती अक्षय कुमारची पत्नी देखील आहे. लग्नानंतर अभिनेत्री चित्रपटांपासून खूप काळ दूर राहिली आहे. पण लग्नापूर्वी तिने एकापेक्षा एक चित्रपटात काम केले आहे. मग तो ‘बरसात’ असो वा ‘मेल’. ती जेव्हा-जेव्हा पडद्यावर आली, तेव्हा तिने आपल्या सौंदर्याने सर्व चाहत्यांचे माने जिकली आहेत. यातील आणखी एक चित्रपट म्हणजे ‘बादशाह’, यामध्ये ती शाहरुख खानसोबत दिसली होती. या चित्रपटातील ‘मोहब्बत हो गई है’ गाण्यासाठी तिने आठवडाभर जेवले नाही. हा चित्रपट 1999 मध्ये प्रदर्शित झाला होता.

गाण्याच्या शूटिंगदरम्यान ट्विंकल खन्ना भुकेने मरत…

ट्विंकल खन्नाने या चित्रपटाच्या या गाण्याच्या शूटिंगचे दिवस आठवले आणि एका मुलाखतीत त्याच्याशी संबंधित एक किस्सा सांगताना म्हणाली की, अभिनेत्री डायट करत नाही, असे चाहते अनेकदा म्हणतात. ती सर्व काही खाते. तिचा असा विश्वास आहे की हे खरे नाही. त्यापैकी बहुतेकांना भुकेने त्रास होत असल्याचे अभिनेत्रीचे मत आहे. किंग खानसोबतच्या ‘बादशाह’च्या एका गाण्याच्या शूटिंगची आठवण सांगताना तिने सांगितले की, यावेळी ती आतून खूप भुकेने मरत होती. आणि शेवटी तिला हरभरे खाल्याचे तिने सांगितले आहे.

ट्विंकल खन्ना पुढे म्हणाली की, ‘मोहब्बत हो गई है’ या गाण्यासाठी तिने हा पोशाख का घातला हे तिला माहीत नाही? अशा प्रकारच्या पोशाखाला कॅटसूट म्हणतात. यामध्ये पोट सपाट दिसते. पण अभिनेत्री म्हणते की सपाट दिसण्यासाठी उपाशी राहावे लागते. हरभरा खाऊन आपण जिवंत राहू शकतो हे तिने स्वतःच ठरवले होते. गुजराती असल्याने हरभरा स्वस्त आणि सहज उपलब्ध होते, असे तिला वाटत होते. तर, हा तिचा आहार म्हणून समावेश केला होता.

‘सालार’ने रचला नवा विक्रम! जगभरात पार केला 300 कोटींचा आकडा; तर, भारतात कमवले ‘इतके’ कोटी

ट्विंकल खन्नाने मुलाखतीत पुढे सांगितले की, त्यावेळी तिची भुकेमुळे प्रकृती नाजूक झाली होती. भुकेमुळे तिच्या पोटात ‘गॅसचा गोळा’ आल्यासारखे वाटत होते. या गाण्यात एक सीन होता, ज्यामध्ये शाहरुख खानला अभिनेत्रीला उचलून घ्यावं लागलं होतं. त्यावेळी ती खूप घाबरली होती. कारण तिच्या पोटाला त्रास होऊ शकतो, अशी भीती तिला वाटत होती. पण असे झाले नाही. तिने तस होऊ देखील दिले नाही. अभिनेत्रीने सांगितले की गाण्यात ती कुठेतरी दात पीसत असेल तर तिच्या शरीराचे इतर भाग देखील अस्वस्थ स्थितीत होते. कसे तरी तिने स्वतःला सावरण्याचे प्रयत्न केले होते. तिला विश्वास होता की, तिच्यासाठी ते खूप कठीण परिस्थिती होती आणि ती त्यातून वाचली.

मात्र, आता ती पडद्यापासून दूर असून तिचा सर्व वेळ पती अक्षय कुमार आणि मुलांसोबत घालवते. शिवाय ट्विंकल खन्ना आता पुस्तके लिहित असते. दरम्यान, ती अनेकदा मोकळेपणाने सामाजिक विषयांवर आपले सडेतोड मत मांडताना देखील दिसत असते.

follow us