Download App

प्रेम, संघर्ष आणि धक्कादायक खुलासे: ‘अ‍ॅडव्होकेट अंजली अवस्थी’ मालिकेत येणार ट्विस्ट; अंकितने केले सुतोवाच

hindi Serial ‘अ‍ॅडव्होकेट अंजली अवस्थी’ मालिकेत एक अनपेक्षित वळण मिळाल्याने अंजलीच्या आनंदात विरजण पडण्याची शक्यता निर्माण झाली.

Twist in hindi Serial ‘Advocate Anjali Awasthi’ : ‘अ‍ॅडव्होकेट अंजली अवस्थी’ मालिकेत अंजलीच्या लग्नाची सुरुवात केवळ एक करार म्हणून झाली होती खरी, मात्र आता ते लग्न एका भावनिक वादळात रूपांतरित झाले, ज्याची अपेक्षा तिने कधी केली नव्हती. सुरुवातीला परिस्थितीने बांधली गेल्याने तिने तिच्या भावनांना दूर ठेवले, परंतु कालांतराने प्रेमाची भावना तिच्या हृदयात फुलू लागली. गेल्या आठवड्यात, एका दीर्घ प्रतीक्षेनंतर, अंजलीने अखेर अमनवर तिचे प्रेम असल्याची कबुली दिली आणि प्रेक्षकांसमोर हृदयाला स्पर्श करणारी रोमँटिक दृश्ये अवतरली. त्यांचे नाते फुलू लागले आणि एक अनपेक्षित वळण मिळाल्याने त्यांच्या नव्या आनंदात विरजण पडण्याची शक्यता निर्माण झाली.

सिक्कीममध्ये चित्रित होणारा पहिला भारतीय चित्रपट ठरला ‘बंजारा’, वाचा, कसा होता तिकडंचा अनुभ

‘अ‍ॅडव्होकेट अंजली अवस्थी’च्या नव्या प्रोमोमध्ये, अंजली आणि अमनच्या आनंदात मिठाचा खडा पडतो, जेव्हा तिचे सासरे एक धक्कादायक मागणी करतात- की जर तिला घराची सून म्हणून स्वीकारले जावे असे वाटत असेल तर तिने कायद्यातील तिचे करिअर सोडून द्यावे. या नव्या मागणीमुळे प्रेम आणि सहवासाचा अंजलीचा सुरू होणारा एक नवा सुंदर प्रवास सर्वात मोठ्या पेचप्रसंगात बदलून जातो.

पिंपरी-चिंचवडमधील 4 दारु दुकानांची ‘बाटली आडवी’, आमदार महेश लांडगेंच्या लक्षवेधीनंतर प्रशासनाचा ‘ॲक्शन मोड’

अभिनेता अंकित रायजादा ऊर्फ अमन याला या मालिकेमधील येणाऱ्या नव्या वळणाविषयी जी उत्सुकता वाटत आहे, ती व्यक्त करताना तो म्हणाला, “अमन आणि अंजली यांच्या नात्यातील काही हृदयस्पर्शी क्षण प्रेक्षकांना अखेर पाहायला मिळतील याबद्दल मी खूप उत्सुक आहे. प्रेमासोबतच, त्यांना अनपेक्षित संघर्ष, कोर्टातील नाट्यमयता आणि काही धक्कादायक खुलासेही पाहायला मिळतील, जे नात्याला धक्का देतील. प्रत्येक एपिसोड काहीतरी नवे घेऊन येणार आहे, ज्यामुळे प्रेक्षक त्यांच्या टीव्ही स्क्रीनवर नक्कीच खिळून राहतील.”

‘अवकारीका’ चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित; 13 जूनला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला..

नातेसंबंध, स्वप्ने आणि अस्मिता पणाला लागल्याने, अंजली नेमका काय निर्णय घेईल? ती कुटुंबाकरता तिच्या महत्त्वाकांक्षेचा त्याग करेल, की ती तिच्या करिअरकरता आणि वकील म्हणून तिची जी ओळख निर्माण झाली आहे, त्याकरता लढा पुकारेल? लढाई नुकतीच सुरू झाली आहे आणि नाट्यमयता अधिक तीव्र होत चालली आहे. स्टार प्लस वाहिनीवर रात्रौ साडेआठ वाजता ‘अ‍ॅडव्होकेट अंजली अवस्थी’ ही मालिका पाहायला विसरू नका.

follow us