Download App

Video: उर्फी जावेदचा नवा कारनामा, अतरंगी कपड्यांमधील नवीन व्हिडीओ तूफान व्हायरल

Uorfi Javed: उर्फी जावेद (Uorfi Javed) ही नेहमी तिच्या हटके आणि अतरंगी स्टाईलने चाहत्यांना सतत चर्चेत असते. उर्फी जावेद आता नव्या अवतारात चाहत्यांना दिसून आली आहे. उर्फीला सतत तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे चाहते तिला खूप ट्रोल (trolling) करत असतात. मात्र, त्याचा उर्फीवर कोणताही परिणाम होत नाही. सोशल मीडियावर (social viral video) सतत विचित्र फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.


आता तिचा आणखी एक असाच नवीन व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार वायरल होत असल्याचे दिसून येत आहे. उर्फीने इंस्टाग्रामवर एक नवीन व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये ती परत एकदा अतरंगी अंदाजात चाहत्यांना दिसून आली आहे. या व्हिडिओमध्ये ती एकदम हॉट दिसत असल्याचे बघायला मिळत आहे. त्यावेळी, तिचे शरीर झाकण्यासाठी, तिने मोत्यांनी बनवलेला एक लांब हार वापरला आहे.

जो तिने तिच्या केसांमध्ये बांधला आहे.या व्हिडीओमध्ये उर्फीने जावेदमध्ये तिचे शरीर मोत्यांच्या हाराने झाकलेले असल्याचे दिसून येत आहे, पण नंतर तिने स्वत:च्याच हातातील कात्रीने तो हार कापल्याचे देखील या व्हिडीओमध्ये दिसत आहे. तो हार कापल्यावर सगळे मोती जमीनीवर घरंगळत आहेत. या व्हिडीओला तिने कॅप्शनमध्ये हा लूक maison_kimhekim पासून प्रेरित असल्याचे तिने यावेळी लिहिले आहे.

हा एक कोरियन फॅशन ब्रँड आहे. उर्फी जावेदचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. चाहत्यांनी तिला पुन्हा ट्रोल करायला सुरुवात केली आहे. या व्हिडिओवर चाहत्यांनी देखील अनेक कमेंट करत आहेत. एका यूजरने लिहिले आहे की, “हे काय होते?” तर दुसऱ्या यूजरने ‘मेंटल हो गई है ये’ अशी कमेंट तिला केली. ‘हे काय कपडे आहेत का ? ‘ असा सवाल देखील चाहत्यांनी कॉमेंटमध्ये विचारले आहेत.

Madhuri Dixit: माधुरी, मुंबई अन् वडापाव; Appleचे सीईओ टीम कुकनेही मारला प्लेटवर ताव

उर्फी जावेदच्या या व्हिडिओवर अशा वेगवेगळे कमेंट्स बघायला आणि वाचायला मिळत असतात. असा विचित्र ड्रेस घातल्याने लोक तिला सतत ट्रोल करत असतात. मात्र, या सगळ्याविषयी उर्फीची काही हरकत नाही. उर्फी जावेद सध्या सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे. तिचे ४१ लाखांहून जास्त लोक फॉलो करतात. उर्फी जावेद ही सतत चर्चेत असते.

उर्फी जावेद ही अगदी कमी कालावधीमध्ये तिच्या अतरंगी कपड्यांमुळे एक खास ओळख आहे. उर्फी ही कधी काय घालेल याचा काय नेम नाही. ती सतत कोणत्या ना कोणत्या विषयावरून वादात सापडते. काही लोक तिला ट्रोल करतात, पण असे बरेच लोक आहेत, जे उर्फी जावेदचे कौतुक देखील करत असतात.

Tags

follow us