झोमॅटोने Uorfi Javed ला दिलेलं खास गिफ्ट, अभिनेत्रीने त्याचाही बनवला ड्रेस, व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल अवाक्

Uorfi Javed: उर्फी जावेद (Uorfi Javed) ही नेहमी तिच्या हटके आणि अतरंगी स्टाईलने चाहत्यांना सतत चर्चेत असते. उर्फी जावेद आता नव्या अवतारात चाहत्यांना दिसून आली आहे. उर्फीला सतत तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे चाहते तिला खूप ट्रोल (trolling) करत असतात. मात्र, त्याचा उर्फीवर कोणताही परिणाम होत नाही. सोशल मीडियावर (social viral video) सतत विचित्र फोटो आणि व्हिडिओ […]

Urfi Javed_4

Urfi Javed_4

Uorfi Javed: उर्फी जावेद (Uorfi Javed) ही नेहमी तिच्या हटके आणि अतरंगी स्टाईलने चाहत्यांना सतत चर्चेत असते. उर्फी जावेद आता नव्या अवतारात चाहत्यांना दिसून आली आहे. उर्फीला सतत तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे चाहते तिला खूप ट्रोल (trolling) करत असतात. मात्र, त्याचा उर्फीवर कोणताही परिणाम होत नाही. सोशल मीडियावर (social viral video) सतत विचित्र फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.


ती नेहमी तिच्या बोल्ड आणि बिनधास्त वक्तव्यामुळे चर्चेत असते. उर्फी जावेद ही तिच्या कामापेक्षा जास्त तिच्या फॅशन आणि वादामुळं जास्त चर्चेत असते. कोणी कितीही बोला, विरोध करा किंवा ट्रोल करा ती काही तिची फॅशन दाखवणं बंद करणार नाही. गेल्या काही दिवसापासून उर्फी जावेदला मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये एंट्री देण्यात आली नाही. यामुळे ती संतापली आणि तिने आपला राग सोशल मीडियावर काढला.


तिच्या कपड्यामुळे तिला प्रवेश नाकारला असंही तिने सांगितले आहे. त्यानंतर तिने तिच्या इन्स्टा स्टोरीवर त्या संबंधात एक पोस्ट देखील टाकली होती, जी व्हायरल झाली आहे. यात तिने Zomato ला टॅग केले होते. त्यानंतर झोमॅटोच्या वतीने उर्फी जावेदसोबत संवाद साधण्यात आला असल्याच दिसून आले होते. तिने त्याच्याकडे तक्रार केली की त्याच्या ऑफरमुळे ती रेस्टॉरंटमध्ये बसू शकत नाही. यावेळी त्याच्यावतीने उर्फीची माफीही मागण्यात आली होती.

यामुळे तिला एक गिफ्टही देण्यात आले आहे. तिला गिफ्ट बास्केट पाठवण्यात आली होती. मात्र उर्फी ही कोणती गोष्ट योग्यरित्या करते. तिने यातही तिच्या फॅशनचा नमुना दाखवला आहे. झोमॅटोने ज्यावेळी तिला बास्केट दिली त्यावेळी तिने त्यांना ड्रेस दिल्याबद्दल धन्यवाद म्हटले आहे. यानंतर उर्फीने टोपलीतून काही सामान काढून त्याच टोपलीने तिचे अंग झाकले असल्याचे दिसून आले आहे.


तिने या पोस्टला कॅप्शन देखील दिले आहे, “किसी की बास्केट, किसी की ड्रेस” अशी पोस्ट उर्फी जावेदची सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे आणि चाहते देखील उर्फीला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. हा फोटो पाहिल्यानंतर चाहत्यांनी देखील डोक्याला हात लावला आहे. मात्र हे काही नवीन नाही उर्फी कोणत्याही गोष्टीपासून ड्रेस तयार करु शकते.

Wrestlers Protest: कुस्तीपटूंना अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचे समर्थन, मदत करण्याची केली विनंती

आत्तापर्यंत लोकांनी उर्फी जावेदला पोत्यापासून ब्लेड, लोखंडी साखळी, इलेक्ट्रिक वायर ते मोबाइल सिम, काच सायकलची चेन, चिमटे इतकच नाही तर किवी च्या फळापासून बनवलेल्या ड्रेसमध्ये बघितले आहे. उर्फी जावेद ही अगदी कमी कालावधीमध्ये तिच्या अतरंगी कपड्यांमुळे एक खास ओळख आहे. उर्फी ही कधी काय घालेल याचा काय नेम नाही. ती सतत कोणत्या ना कोणत्या विषयावरून वादात सापडते. काही लोक तिला ट्रोल करतात, पण असे बरेच लोक आहेत, जे उर्फी जावेदचे कौतुक देखील करत असतात.

Exit mobile version