Download App

Urfi Javed: उर्फी जावेदने ८१ कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी अशनीर ग्रोव्हरची उडवली खिल्ली, म्हणाली…

Urfi Javed : भारतपेचे माजी व्यवस्थापकीय संचालक अशनीर ग्रोव्हर (Ashneer Grover) , त्याची पत्नी माधुरी जैन ग्रोव्हर आणि दीपक गुप्ता, सुरेश जैन आणि श्वेतांक जैन यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील काही सदस्यांविरुद्ध ८१ कोटींच्या फसवणुकीच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे अशनीर हे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अशनीरच्या या घोटाळ्यावर मॉडेल आणि अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed ) हिनेदेखील अशनीर ग्रोव्हरची खिल्ली उडवली आहे.

अशनीर ग्रोव्हर आणि त्याने सुरू केलेली फीनटेक कंपनी BharatPe यांच्यामध्ये सुरू असलेला जोरदार वाद दोन्ही बाजूंनी सुटलेला आता दिसून येत नाही. आता या प्रकरणामध्ये आर्थिक गुन्हे शाखेने फसवणुकीच्या आरोपाखाली अशनीर ग्रोव्हर आणि त्याच्या कुटुंबाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तर ‘भारतपे’च्या तक्रारीच्या आधारे एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

उर्फीच्या फॅशनबद्दल सतत टिप्पणी करतानाचा एक व्हिडिओ क्लिप उर्फीने शेअर केला आहे. अशनीरचं मूळ काम काय आहे. याविषयी उर्फीने मोठे वक्तव्य केले आहे. अशनीरचा हा व्हिडिओ स्टोरीवर शेअर केल्यावर लगेचच उर्फी जावेदने पुढील पोस्टमध्ये अशनीरच्या ८१ कोटींच्या घोटाळ्याची बातमी शेअर करत अशनीर ग्रोव्हरची खिल्ली उडवली आहे. आणि ही बातमी शेअर करताना उर्फीने लिहिले आहे की, ‘यांचं कोर हेच करोडोंची फसवणूक करायचे आहे, म्हणूनच ही मंडळी सेलिब्रिटी आहेत.

‘TMKOC च्या’ निर्मात्यांवर लैंगिक शोषणाचा आरोप केल्यानंतर आत्माराम भिडेंची प्रतिक्रिया; म्हणाले…

उर्फीच्या या पोस्टमधून अशनीर ग्रोव्हरने केलेल्या वक्तव्यावर खोचक उत्तर दिले आहे. हे प्रकरण गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. याअगोदर अशनीर ग्रोव्हरने कोटक बँकेच्या कर्मचार्‍यांशी केलेल्या गैरवर्तनाची ऑडिओ क्लिप व्हायरल करण्यात आली होती. त्यानंतर फेब्रुवारी २०२२ मध्ये माधुरी जैन यांना फसवणुकीच्या आरोपावरून कंपनीतून काढून टाकण्यात आले होते. अशनीरच्या पत्नीने कंपनीच्या निधीतील पैसे खासगी गोष्टींसाठी खर्च केल्याचा आरोप देखील कंपनीने केला होता.

Tags

follow us