Urfi Zeenat Aman: उर्फी अन् झीनत अमान यांच्यात नेमकं काय घडलं? घ्या जाणून…

Urfi Zeenat Aman: उर्फी जावेद ही नेहमी तिच्या अतरंगी लूकसाठी ओळखली जात असते. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात तिचे फॅन फाॅलोइंग पाहायला मिळेल. उर्फी जावेद (Uorfi Javed) ही बिग बाॅस ओटीटीपासून खास ओळख निर्माण केली आहे. ती फक्त बिग बाॅस (Bigg Boss) ओटीटीच नाही तर उर्फी जावेद ही अनेक सिरीयलमध्ये महत्वाच्या भूमिकादेखील करत असल्याचे दिसून येत […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 06T151716.942

Urfi Zeenat Aman

Urfi Zeenat Aman: उर्फी जावेद ही नेहमी तिच्या अतरंगी लूकसाठी ओळखली जात असते. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात तिचे फॅन फाॅलोइंग पाहायला मिळेल. उर्फी जावेद (Uorfi Javed) ही बिग बाॅस ओटीटीपासून खास ओळख निर्माण केली आहे. ती फक्त बिग बाॅस (Bigg Boss) ओटीटीच नाही तर उर्फी जावेद ही अनेक सिरीयलमध्ये महत्वाच्या भूमिकादेखील करत असल्याचे दिसून येत असते.


ती तिच्या कपड्यांमुळे मीडियाच्या चर्चेत असते. उर्फीच्या एका व्हिडिओने पुन्हा एकदा इंटरनेटवर खळबळ उडवून दिली आहे. यामध्ये ती अगोदरच्या काळातील प्रसिद्ध अभिनेत्री झीनत अमानच्या सोबत दिसत आहे. हा व्हिडिओ प्रसिद्ध फॅशन डिझायनर अमित अग्रवाल यांच्या नवीन स्टोअरच्या उद्घाटनाचा आहे, जे त्यांनी अलीकडेच दिल्लीत सुरु केले आहे.

अमित अग्रवाल यांच्या नवीन स्टोअरच्या उद्घाटनाला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. उर्फी जावेद आणि झीनत अमानही एका वेगळ्या अंदाजात या कार्यक्रमाला पोहोचले होते. सध्या या दोघींचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये उर्फी झीनत अमानसोबत काही संवाद साधत असल्याचे दिसत आहे. त्याचवेळी झीनत उर्फीला काहीतरी बोलताना दिसत आहे. यावर युजर्सनी खूप मजेशीर कमेंट्स केल्या आहेत


डाएट सब्या नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. त्यासोबत ‘कॅप्शन द्या’ असे लिहिले आहे. यानंतर या व्हिडिओवर एकामागून एक मजेशीर कमेंट्स पोस्ट करत आहेत. एका यूजरने लिहिले आहे की, ‘उर्फी जावेद झीनत जींना ‘सत्यम शिवम सुंदर 2.0’ साठी मार्गदर्शन करण्यास सांगत आहे. 1978 मध्ये आलेल्या ‘सत्यम शिवम सुंदरम’ या चित्रपटात झीनत अमानने मुख्य भूमिका साकारली होती.


दुसर्‍या यूजरने लिहिले आहे की, ‘उर्फी झीनत अमानला सांगत आहे की मॅडम प्लीज एकदा स्पून स्कर्ट घालण्याचा प्रयत्न करा.’ तर तिसऱ्या यूजरने लिहिले की, जबरदस्त बोल्ड सीन्स देण्यात आले होते, झीनत अमान देखील तिच्या फॅशन आणि स्टाइलमुळे चर्चेत आली होती. चित्रपटांमध्ये बोल्ड सीन्स चित्रित करण्यासाठी त्यांना अनेक टीकेलाही सामोरे जावे लागले होते.

‘The Kerala Story’ सिनेमाच्या ट्रेलरवर युट्यूबची मोठी कारवाई; अभिनेत्री, म्हणाली…

झीनत अमानने तिच्या करिअरमध्ये ‘हरे रामा हरे कृष्णा’, ‘यादों की बारात’, ‘रोटी कपडा और मकान’, ‘चोरी मेरा काम’, ‘पापी’, ‘धरम वीर’, ‘कुर्बानी’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले. झीनतने ‘सत्यम शिवम सुंदरम’मध्ये शशी कपूरसोबत खूप बोल्ड सीन्स दिले होते. राज कपूर दिग्दर्शित या चित्रपटाने त्यावेळी बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती.

Exit mobile version