Rajinikanth : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सु्प्रसिद्ध अभिनेते रजनीकांत (Rajinikanth) यांनी आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांची भेट घेतली. इतकेच नाही तर त्यांनी योगी आदित्यनाथ यांची भेट घेत बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई करत असलेला जेलर चित्रपटही पाहिला.
#WATCH | Actor Rajinikanth meets Uttar Pradesh CM Yogi Adityanath at his residence in Lucknow pic.twitter.com/KOWEyBxHVO
— ANI (@ANI) August 19, 2023
दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता थलायवा म्हणजेच चाहत्यांचा लाडका रजनीकांतचा (Rajinikanth) ‘जेलर’ हा सिनेमा स्वातंत्र्य दिनाच्या अगोदर रिलीज करण्यात आला आहे. तब्बल २ वर्षांनंतर थलायवा आता मोठ्या पडद्यावर आला आहे. पहिल्या दिवशीच या सिनेमाने कमाईविषयी एक अनोखा रेकॉर्ड केल्याचे बघायला मिळाले आहे. सिनेमाने ५२ कोटी रुपयांची सर्वात मोठी कमाई केली होती. चित्रपट अजूनही जबरदस्त कमाई करत आहे.
लखनऊ येथे आगमन झाल्यानंतर मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी रजनीकांत यांचे स्वागत केले. यावेळी रजनीकांत यांनी योगी आदित्यनाथ यांच्या पायांना स्पर्श केला. त्यांच्या पाया पडले. योगी आदित्यनाथ यांनीही त्यांचे स्वागत केले. यानंतर रजनीकांत यांनी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांचीही भेट घेतली. या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
रजनीकांत आपल्या जेलर या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी उत्तर प्रदेशात आले आहेत. दाक्षिणात्य चित्रपटांतील अभिनेते आता चित्रपटांच्या प्रमोशनसाठी उत्तर भारतात येण्याचा प्रघात सुरू झाला आहे. याआधी आरआरआर चित्रपटाची टीमही चित्रपटाच्या प्रमोशनसाठी उत्तर भारताच्या दौऱ्यावर आली होती. त्यानंतर आता रजनीकांत सपत्नीक उत्तर प्रदेशात दाखल झाले आहेत.