Hor Koi Na Song Release: व्हॅलेंटाईन डेच्या (Valentine Day) निमित्ताने अपारशक्ती खुरानाने (Aparshakti Khurana) त्याची पत्नी आकृती आहुजा (Aakriti Ahuja) या दोघांनी प्रेक्षकांना एक परफेक्ट ट्रीट दिली आहे. ‘होर कोई ना’ हे खास प्रेम गीत (Hor Koi Na Song) प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आले आहेत. अपारशक्ती त्याच्या चाहत्यांना या गाण्यातून खास ट्रीट देणार आहेत.
मनसिमरन संधू यांनी लिहिलेल्या आणि संगीतबद्ध केलेल्या गाण्यासोबत ही मधुर धून त्याच्या आणि त्याची पत्नी आकृती आहुजा यांच्यातील जोडीचा अनोखा संगम यातून अनुभवयाला मिळणार आहे. या गाण्याबद्दल बोलताना तो म्हणतो ” मला वाटलं व्हॅलेंटाईनसाठी काहीतरी खास करू. आम्ही पहिल्यांदा एकत्र गाणे केले आहे. आकृतीला तिच्या कामाची बांधिलकी आणि आईची कर्तव्ये लक्षात घेऊन तिला पटवणे कठीण होत पण सोबतीने एक गाणं आम्हाला करायचं होत. हा व्हिडिओ ऑस्ट्रेलियामध्ये शूट करण्यात आला आहे.
Shreyas Talpade: ‘व्हॅलेंटाईन डे’ निमित्ताने ‘ही अनोखी गाठ’मधील ‘मी रानभर’ प्रेमगीत रिलीज
तसेच गाण्याच्या पहिल्या काही ओळी सांगतात की मी तिला कॉल करत राहिलो आणि ती माझे फोन कॉल उचलत नाही, वास्तविक जीवनातही आकृतीसाठी अगदी योग्य आहे. गीतकार आणि संगीत दिग्दर्शक मनसिमरन संधू यांचे सर्वात ऑर्गेनिक लेखन आणि रचनेबद्दल खूप आभार. ‘होर कोई ना’ हे गाणं अपारशक्ती आणि आकृतीचं आजवर मनाला भावलेल उत्तम गाणं आहे.