सुकेशचा व्हॅलेंटाईन डे; जॅकलिन फर्नांडिसला गिफ्ट केलं जेट विमान

Jacqueline Fernandez : नेहमी काहींना काही कारनाने सोशल मीडियावर चर्चेत राहणाऱ्या फसवणुकीचा आरोपी सुकेश चंद्रशेखर पुन्हा एकदा चर्चेत आहे.

Jacqueline Fernandez

Jacqueline Fernandez

Jacqueline Fernandez : नेहमी काहींना काही कारनाने सोशल मीडियावर चर्चेत राहणाऱ्या फसवणुकीचा आरोपी सुकेश चंद्रशेखर पुन्हा एकदा चर्चेत आहे. त्याने अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला व्हॅलेंटाईन डेनिमित्त जेट विमान गिफ्ट दिला असल्याचा दावा सोशल मीडियावर करण्यात येत आहे. यासोबतच सोशल मीडियावर त्याने लिहिलेला एक पत्र देखील व्हायरल होत आहे. या पत्रात सुकेशने अभिनेत्री जॅकलिनला व्हॅलेंटाईन असा उल्लेख केला आहे.

त्याने या पत्रात लिहिले आहे की, हा व्हॅलेंटाईन डे त्याच्यासाठी खास आहे. तो त्या दिवसाची वाट पाहत आहे जेव्हा ते त्यांचे उर्वरित आयुष्य एकत्र साजरे करू शकतील. पत्रात, त्याने जॅकलिनवर प्रेम व्यक्त केले, लिहिले की तो तिला “जगातील सर्वोत्तम व्हॅलेंटाईन” मानतो. गल्फस्ट्रीम जेट गिफ्ट देण्याचा दावा सुकेशने त्याच्या पत्रात दावा केला की, त्याने जॅकलिनसाठी (Jacqueline Fernandez) खास गल्फस्ट्रीम जेट कमिशन केले होते. त्यावर बाहेरून आणि आत दोन्ही बाजूंनी त्याचे आद्याक्षरे “जेएफ” लिहिलेले आहेत. त्याने असेही म्हटले की जेटचा नोंदणी क्रमांक जॅकलिनच्या जन्मतारीख आणि महिन्याशी जुळतो, ज्यामुळे गिफ्ट आणखी खास बनते. जॅकलिन कामासाठी आणि शूटिंगसाठी वारंवार प्रवास करत असल्याने, हे जेट तिला खूप सोयीचे ठरेल असं त्याने या पत्रात म्हटले आहे.

तसेच पत्रात सुकेशने (Sukesh Chandrashekhar) असा दावाही केला की, तो या वर्षी त्याच्या आयकर रिटर्नमध्ये जेट घोषित करणार आहे आणि त्यावर लागू असलेले सर्व टॅक्स भरणार आहे.

 

जॅकलिनकडून कोणतीही प्रतिक्रिया नाही

तर दुसरीकडे सुकेश चंद्रशेखर सध्या तुरुंगात आहे आणि यापूर्वी त्याने जॅकलिनला अनेक वेळा पत्र लिहिले आहे. या नवीन दाव्याबाबत जॅकलिनकडून कोणताही अधिकृत प्रतिसाद मिळालेला नाही. सुकेश चंद्रशेखर 2015 पासून तुरुंगात आहे. त्याच्यावर कोट्यवधी रुपयांच्या फसवणुकीचे गंभीर आरोप आहेत. ईडीच्या चौकशीदरम्यान, त्याचे नाव बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसशी जोडले गेले. सुकेशने दावा केला की तो जॅकलिनला डेट करत होता. त्याच्या दाव्यांनंतर, दोघांचे काही फोटो सोशल मीडियावरही समोर आले.

RSS इंग्रजाची गुलामी आणि हेरगिरी करत होते, फडणवीसांनी इतिहास शिकवू नये; हर्षवर्धन सपकाळांचं प्रत्युत्तर

जॅकलिनने सुकेशचे दावे फेटाळले

यापूर्वी सुकेशबाबत जॅकलिन फर्नांडिसने प्रतिक्रिया देत सुकेशने स्वतःला कायदेशीर व्यावसायिक म्हणून ओळख करून तिची दिशाभूल केली असं म्हटले होते. तसेच सुकेशने तिला धमकावण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे तिला मानसिक आघात आणि त्रास झाला असं देखील ती म्हणाली होती.

Exit mobile version