Bharati Gosavi : ज्येष्ठ अभिनेत्री भारती गोसावी (वय 84) यांचे शुक्रवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले असल्याची माहिती समोर आली आहे. शुक्रवारी रात्री पुण्यात त्यांची प्राणज्योच मालवली असून शनिवारी दुपारी 12 वाजता वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांकडून देण्यात आली आहे.
भारती गोसावी (Bharati Gosavi) यांनी रंगभूमीवर 58 वर्षांत 80 मराठी नाटकांमधून सव्वाशेच्या वर भूमिका केलेल्या आहे. पुण्याच्या भानुविलास थिएटरमध्ये, पृथ्वी थिएटर आणि बालगंधर्व यांची नाटके होत होती. त्यांनी 1958 मध्ये सौभद्र नाटकातून रंगभूमीवर पदार्पण केले. शंकर लोहकरे हे त्यांचे पहिले गुरू होते. त्यांनी अत्रे थिएटर्स, कलावैभव, चंद्रलेखा, नाट्यमंदार, पराग आदी नाटक मंडळींच्या नाटकांत कामे केली. काशीनाथ घाणेकर, अविनाश खर्शीकर आदी दिग्गज नायकांबरोबर ‘तुझे आहे तुजपाशी’मध्ये गीताची भूमिका केली.
आज भारतीय क्रिकेटसाठी मोठा दिवस; नवीन कसोटी कर्णधाराची होणार घोषणा
वयाची 75 आणि रंगभूमीवर 58 वर्षे पूर्ण केली म्हणून अखिल भारतीय नाट्य परिषद, मनोरंजन (पुणे) व भरत नाट्य संशोधन मंडळ या संस्थांतर्फे 2016 मध्ये भारती गोसावी यांचा विशेष सत्कार झाला. तसेच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पुणे शाखेचा 2015 सालचा चित्तरंजन कोल्हटकर स्मृती पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला हाेता.
phone नंतर Samsung फोनही अमेरिकेत होणार महाग, ट्रम्प यांची मोठी घोषणा