Veteran actress Jyoti Chandekar passes away Actress Tejaswini Pandit mourns her mother’s death : ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे दुःखद निधन झाले आहे. उद्या सकाळी 11 वाजता त्यांच्यावर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांनी वयाच्या 79 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्या प्रसिद्ध अभिनेत्री तेजस्विनी पंडितच्या मातोश्री होत्या. त्यांनी अनेक चित्रपटांसह मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारलेल्या आहेत. विशेष म्हणजे त्यांनी माय लेकींनी सिंधूताई सपकाळच्या भूमिका साकारल्या आहेत. तरूणपणी तेजस्विनी तर वृद्धापकळातील सिंधूताई या ज्योती चांदेकर यांनी साकारल्या आहेत.
Sharad Pawar : पुण्यात शरद पवारांबरोबर फोटो काढण्यासाठी आजींचा हट्ट
‘मी सिंधुताई सपकाळ’, ‘पाऊलवाट’, ‘सुखान्त’ या चित्रपटांमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेणाऱ्या जेष्ठ अभिनेत्री म्हणजे ज्योती चांदेकर ज्योती चांदेकर मूळच्या पुण्याच्या. त्यांची सुरुवात झाली ती एका हिंदी चित्रपटातील छोट्याशा भूमिकेमुळे. १९६९ सालची ही गोष्ट. त्या वडिलांसोबत ‘एक नजर’ या हिंदी चित्रपटांचं शूटिंग बघण्यासाठी हौसेने गेल्या होत्या. चित्रपटाच्या दिग्दर्शकाने छोट्या भूमिकेसाठी काही मुलींना बोलावलं होतं. पण त्या मुलींच्या मराठी वळणाच्या हिंदी उच्चारांनी तो त्रस्त होता. त्याने ज्योती चांदेकरांना काही ओळी सहज वाचायला दिल्या. त्यांनी त्या वाचल्याबरोबर दिग्दर्शक म्हणाला, या मुलीला मेकअप करायला न्या. त्याच्या पुढच्याच वर्षी पुण्यात दिग्दर्शक अनंत ओक यांनी ‘सुंदर मी होणार’ या नाटकासाठी त्यांना निवडलं.
मुंबईत दहीहंडी उत्सवाला शेवटी गालबोट लागलच; मानखुर्दमध्ये रोप बांधताना गोविंदाचा मृत्यू
पुढे बाबुराव गोखलेंच्या ‘करायला गेलो एक’, ‘वऱ्हाडी मान्सं’, ‘स्वयंसिद्धा’ अशा नाटकांतून कामं केली. पणशीकरांच्या ‘नाट्यसंपदे’ने सादर केलेल्या ‘बेईमान’ या नाटकात त्यांना अभिनयाची संधी मिळाली. पणशीकरांसह सतीश दुभाषी प्रमुख भूमिकेत होते. या निमित्ताने मुंबईच्या रंगभूमीवर त्यांचं आगमन झालं. पण मुंबईत राहण्याची सोय नसल्यामुळे निर्मात्यांना त्यांना घेणं अडचणीचं ठरलं. दरम्यान पुण्यात त्यांची ‘रखेली’, ‘राजकारण गेलं चुलीत’, ‘कथा अकलेच्या कांद्याची’ ही नाटकं खूप चालली. मात्र, त्यांचा बोलबाला झाला तो ‘आमदार सौभाग्यवती’ या नाटकामुळे. देखणं ठसठशीत व्यक्तिमत्व, भेदक डोळे आणि करारी आवाज यांची किमया या व ‘माझं घर’ व ‘मित्र’ या नाटकांनी दाखवली. त्या रंगमंचावर असल्या की प्रेक्षकाला एका शब्दाने वा हालचालीनेही बांधून टाकत. थिएटर अकॅडमीने ‘हू इज आफ्रेड ऑफ व्हर्जिनिया वूल्फ’ हे नाटक ‘उत्तररात्र’ नावाने मराठीत सादर केलं, तेव्हा त्यातली पडद्यावर एलिझाबेथ टेलरने गाजवलेली मार्थाची गुंतागुंतीची भूमिका ज्योती चांदेकर यांनी अशी अफाट रंगवली की सगळेच थक्क झाले.
लग्नाळू युवकाची फसवणूक; 7 तोळ्यांहून अधिक सोन्याचांदीच्या दागिने, 4 लाखांची रक्कमेसह पत्नी फरार
1972 प्रदर्शित झालेल्या बी आर इशारा दिग्दर्शित ‘एक नजर’ या चित्रपटात ज्योती चांदेकर यांनी अमिताभ बच्चन यांच्या सावत्र आईची भूमिका साकारली होती आणि त्या वेळेस त्या अवघ्या 16 वर्षांच्या होत्या. ज्योती चांदेकरांचे ‘मी सिंधुताई सपकाळ’,‘पाऊलवाट’,‘सुखान्त’ हे चित्रपट त्यांच्या अभिनया मुळे खूप गाजले. ज्योती चांदेकरांचे गुरू, ढोलकी, तिचा उंबरठा, दमलेल्या बाबाची कहाणी, सलाम, सांजपर्व हे इतर चित्रपट होत.अभिनेत्री तेजस्विनी पंडित ही ज्योती चांदेकर यांच्या कन्या होत. ज्योती चांदेकर यांना अ. भा. मराठी नाट्य परिषदेच्या पुणे शाखे तर्फे जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले होते.
आत्मचरित्र प्रकाशित होऊच शकले नाही
ज्योतीताईंचं आत्मचरित्र ‘अनुबंध प्रकाशना’तर्फे प्रकाशित व्हायचे होतं. पण त्यांच्या आजारपणामुळे, मुहूर्त मिळाला नाही आणि त्याचं प्रकाशन लांबत गेले.
…https://youtu.be/caM-Id_qHQ4?si=NNWXdJ3LdV4_enCi