Download App

अभिनय अन् नृत्यकौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन

आपल्या अभिनय आणि नृत्यकौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन

  • Written By: Last Updated:

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतून दु:खद बातमी समोर आली आहे. (Actress) आपल्या अभिनय आणि नृत्यकौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन झालं आहे. त्यांनी वयाच्या ९४ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीतून शोक व्यक्त केला जात आहे. संध्या या सुप्रसिद्ध दिग्दर्शक व्ही. शांताराम यांच्या तिसऱ्या पत्नी होत्या.

राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अ‍ॅड.आशिष शेलार यांनी ट्विट करून ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांच्या निधनाची माहिती शेअर केली. त्यांनी लिहिले की, भावपूर्ण श्रद्धांजली! पिंजरा चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री संध्या शांताराम जी यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी आपल्या अप्रतिम अभिनय आणि नृत्यकौशल्याने प्रेक्षकांच्या मानावर एक वेगळी छाप पाडली.

सर्जनशीलतेला वाव देण्यासाठी‘अभिजात मराठी’ ओटीटी प्लॅटफॉर्म महत्त्वाचा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

झनक झनक पायल बाजे, दो आंखें बारह हाथ आणि विशेषत: पिंजरा चित्रपटामधील त्यांची अजरामर भूमिका प्रेक्षकांच्या मनात कायम स्मरणात राहील. संध्या शांताराम यांचं खरं नाव विजया देशमुख होते. त्या प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक व्ही. शांताराम यांच्या तिसऱ्या पत्नी होत्या. त्यांनी १९५० आणि १९६०च्या दशकात सक्रीय काम केलं. त्या एक उत्कृष्ट अभिनेत्री असण्यासोबतच दिग्गज नृत्यांगणा म्हणूनही ओळखल्या जात होत्या. त्यांच्या अनेक भूमिकांमध्ये त्यांनी अप्रतिम नृत्य सादर केलं.

संध्या शांताराम यांनी त्यांच्या चित्रपटांमधून भारतीय चित्रपटसृष्टीला दिलेले योगदान अमूल्य आहे. विशेषत: ‘पिंजरा’ चित्रपटामुळे त्यांचे नाव आजही मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात महत्त्वाचं मानलं जातं. ‘पिंजरा’तील त्यांच्या नृत्याची आणि अभिनयाची छाप आजही प्रेक्षकांच्या मनावर कायम आहे. १९५९ साली आलेल्या व्ही. शांताराम यांच्या नवरंग सिनेमातून संध्या यांनी कमाल दाखवली होती. “अरे जा रे हट नटखट” हे त्यांचे गाणे आजही तुफान लोकप्रिय आहे.

follow us

संबंधित बातम्या