सर्जनशीलतेला वाव देण्यासाठी‘अभिजात मराठी’ ओटीटी प्लॅटफॉर्म महत्त्वाचा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Devendra Fadanvis : मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झाला. 'अभिजात मराठी' सारखा ओटीटी प्लॅटफॉर्म आज काळाची गरज आहे.

  • Written By: Published:
Abhijat Marathi OTT platform important to give scope to creativity: Chief Minister Devendra Fadnavis

Devendra Fadanvis On Abhijat Marathi: मराठी भाषेचं सामर्थ्य, तिचं जतन, प्रचार आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने वेगवेगळ्या संकल्पना राबविल्या जात असताना तंत्रज्ञानाचा हात धरून मराठी ही ज्ञानार्जन आणि अर्थाजनची भाषा व्हावी या उद्देशाने सुमन एंटरटेनमेंटने ‘अभिजात मराठी’(Abhijat Marathi) या ओटीटी प्लॅटफॉर्मची मुहूर्तमेढ रोवली. ‘अभिजात मराठी’ या ॲपचा लोकार्पण सोहळा नुकताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि (Devendra Fadanvis) राज्याचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झाला.

ध्रुव जुरेलने ठोकलं पहिलं शतक; ऋषभ पंतमुळे मिळाला संधी, नेमकं काय घडलं?

‘अभिजात मराठी’ सारखा ओटीटी प्लॅटफॉर्म आज काळाची गरज आहे. ‘अभिजात मराठी’च्या संपूर्ण टीमचं अभिंनदन करताना या ॲपमुळे मराठीच्या संवर्धनासाठी मदत होईल. मराठीतून आपल्या सर्जनशीलतेला वाव देण्यासाठी हा ओटीटी प्लॅटफॉर्म आजच्या घडीला अतिशय महत्त्वाचा आहे, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. (Abhijat Marathi OTT platform important to give scope to creativity: Chief Minister Devendra Fadnavis)

‘न्यायालयाला राजकीय आखाडा बनवू नका’, विजयच्या रॅलीतील चेंगराचेंगरीची CBI चौकशी करण्यास हायकोर्टाचा नकार

मनोरंजन, राजकीय आणि सामाजिक विषयांबरोबरच मराठी साहित्य आणि संस्कृती सर्वदूर पोहोचवणं हा ‘अभिजात मराठी’ चा उद्देश आहे. असंख्य चांगल्या गोष्टी प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्याचं काम करणाऱ्या ‘अभिजात मराठी’ या ओटीटी प्लॅटफॉर्मचे आणि ॲपचे कौतुक मंत्री उदय सामंत यांनीही केले.

या ॲपची निर्मिती करण्यामागचा एकमेव हेतू म्हणजे आपली मराठी भाषा आणि संस्कृती टिकवणं आहे. अभिजात मराठी या ॲपवर मराठी सिनेमा, नॉन फिक्शन शो, वेबसिरीज,आंतरराष्ट्रीय डब काँटेंट आदी मनोरंजनाची मेजवानी पाहायला मिळेल. हा ॲप फ्री असून कोणीही सहजरित्या डाऊनलोड करू शकतो. येत्या ९ तारखेपासून या ॲपवर चित्रपटांचा आस्वाद प्रेक्षकांना घेता येणार आहे. सध्या अनेक मराठी कलाकृतींना प्रमुख ओटीटी प्लॅटफॉर्मवर कमी प्राधान्य दिलं जातं. ‘अभिजात मराठी’ हे त्यावर एक सशक्त आणि हक्काचं उत्तर ठरणार आहे.

follow us