मोठी बातमी! ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका

ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांना तातडीने मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले.

News Photo   2026 04 11T203816.680

मोठी बातमी! ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका

ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले (Asha Bhosale) यांना ह्रदयविकाराचा झटका आल्याची घटना घडली आहे. त्यांना तात्काळ ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अद्याप त्यांच्या प्रकृतीबद्दलची पुढची माहिती रुग्णालयाकडून देण्यात आलेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, आशा भोसले यांची प्रकृती शनिवारी ह्रदयविकाराचा झटका आल्याने बिघडली. त्यांना तातडीने मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर अत्यावश्यक वैद्यकीय कक्षामध्ये उपचार सुरू आहेत.

कुटुंबाकडून माहिती देण्यात आलेली नाही

आशा भोसले यांना हॉर्ट अटॅक आल्यानंतर पॅपराझी रुग्णालयाबाहेर पोहोचले आहेत, मात्र कुटुंबीयांकडून त्यांना कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. या बातमीमुळे आशा भोसले यांच्या चाहत्यांमध्ये चिंता पसरली आहे. त्यांनी संगीत क्षेत्रात मोठे नाव कमावले असून त्यांच्या गाण्यांना लोकांकडून मोठी पसंती मिळते. त्या गेल्या 70 वर्षांहून अधिक काळ या क्षेत्रात सक्रिय आहेत.

हजारो गाणी गायली

आशा भोसले यांनी 1948 साली सावन आया या गाण्याद्वारे आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली, जे चुनरिया या चित्रपटातील गाणे होते. आतापर्यंतच्या कारकिर्दीत त्यांनी सुमारे 16000 गाणी गायली आहेत. त्यांनी केवळ हिंदीच नव्हे तर मराठी, बंगाली, गुजराती, पंजाबी, भोजपुरी, तमिळ, मल्याळम, इंग्रजी आणि रशियन अशा अनेक भाषांमध्येही आपल्या आवाजाची छाप पाडली आहे. त्यामुळे भारताच्या कानाकोपऱ्यासह जगभरात त्यांचा चाहता वर्ग आहे.

आर डी बर्मन यांच्याशी लग्न

आशा भोसले यांनी बॉलीवूडमधील दिग्गज संगीत दिग्दर्शक आर. डी. बर्मन यांच्याशी विवाह केला होता. ते स्वतःही संगीत क्षेत्रातील सुपरस्टार होते आणि हिंदी चित्रपटांमधील त्यांचे संगीत आजही तितकेच लोकप्रिय आहे. आशा भोसले यांनीही 2200 हून अधिक चित्रपटांमध्ये आपल्या सुरांची जादू दाखवली आहे. त्यांना 2008 साली पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. याशिवाय त्यांनी अनेक पुरस्कार आणि सन्मान आपल्या नावावर केलेले आहेत.

Exit mobile version