Download App

Bad Newz OTT Release: तृप्ती डिमरीचा ‘बॅड न्यूज’ ओटीटीवर रिलीज होणार, जाणून घ्या कधी आणि कुठे

Bad Newz OTT Release: तृप्ती डिमरी (Tripti Dimri), विकी कौशल (Vicky Kaushal) आणि पंजाबी स्टार एमी विर्क यांचा 'बॅड न्यूज' (Bad Newz) चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे.

Bad Newz OTT Release: तृप्ती डिमरी (Tripti Dimri), विकी कौशल (Vicky Kaushal) आणि पंजाबी स्टार एमी विर्क यांचा ‘बॅड न्यूज’ (Bad Newz) चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. चित्रपटगृहांमध्ये या चित्रपटाने चांगली कमाई केली असून चाहते चित्रपटाचा आनंद लुटत आहेत. चित्रपटाने व्यवसायातही चांगली कमाई केली आहे, ओपनिंग वीकेंडला चांगले कलेक्शन केले आहे. सध्या सिनेमाला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे.


आता सिनेमाबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे. ज्यांना काही कारणास्तव चित्रपटगृहात ‘बॅड न्यूज’ बघता आली नाही किंवा जाऊ शकले नाहीत. त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. हा चित्रपट ओटीटीवर कधी आणि कुठे प्रदर्शित होणार चला तर मग जाणून घ्या….

जोरदार प्रमोशन

‘बॅड न्यूज’चा ट्रेलर आणि गाणी खूप आवडली आहेत. या चित्रपटात तृप्ती डिमरी आणि विकी कौशल यांच्यातील रोमान्स पाहून चाहते थक्क झाले आहेत. दोघेही चित्रपटात अप्रतिम आहेत आणि लोकांना एमी विर्कचे कामही आवडले आहे.

Bad Newz: विकी कौशलच्या ‘बॅड न्यूज’ची बंपर ॲडव्हान्स बुकिंग; पहिल्याच दिवशी होणार जबरदस्त कमाई

या चित्रपटाची सर्वाधिक चर्चा त्याच्या ‘तौबा-तौबा’ या गाण्याने झाली आहे. तौबा-तौबा हे गाणे सध्या सोशल मीडियावर लोकप्रिय आहे. प्रत्येकजण त्यावर रील बनवण्यात व्यस्त आहे. अशा परिस्थितीत चित्रपटाला जोरदार प्रमोशन मिळाले, ज्याचा चित्रपटगृहांमध्येही फायदा झाला.

follow us