Download App

Video : अनिल कपूरची पद्यामागाची गंमत, पाहा ग्रुप कॅप्टन राकेश जयसिंगच्या मेकिंगची झलक!

Video of making of captain jay Singh : सिनेमॅटिक आयकॉन अनिल कपूर (captain jay Singh) स्टारर ‘फाइटर’ (fighter) सध्या चर्चेत असताना त्याने जगभरात प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. फायटर चित्रपटाच सर्वत्र कौतुक होताना दिसतंय सोबतीला या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर कमाई केली आहे. सिनेमागृहांमध्ये सतत चर्चेत आहे.

सत्ताधारी आमदारांवर महापालिका मेहरबान; मुंबईकरांचा पैसा सरकारच्या बापाचा का? काँग्रेसचा संतप्त सवाल

फायटरमधील कॅप्टन रॉकी उर्फ ​​अनिल कपूरने सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित चित्रपटाच्या सेटवरून एक अफलातून बीटीएस व्हिडिओ सोशल मीडिया वर शेयर केला आहे. या व्हिडिओमध्ये मेगास्टार अनिल कपूर यांनी या भूमिकेसाठी कशी तयारी केली आणि पद्यामागाची खरी गंमत यातून बघायला मिळते. चित्रीकरणातील काही स्नॅपशॉट्सची झलक यातून बघायला मिळत आहे.

चीनचा मुद्दा आला की सरकारची दातखिळी बसते, केवळ चीनी अ‍ॅप्सवर बंदी घालून…; आव्हाडांचे टीकास्त्र

अनिल कपूर यांनी इंस्टाग्राम वर हा व्हिडिओ शेयर केला असून त्याला कॅप्शन दिलं ” कठीण, अधिकृत आणि अटूट. ग्रुप कॅप्टन राकेश जयसिंगच्या निर्मितीची झलक तुम्हाला दाखवत आहे ” ROCKY.. #Fighter Forever 🇮🇳.”फायटर बद्दल बोलायचे तर या चित्रपटात हृतिक रोशन, दीपिका पदुकोण आणि अनिल कपूर, करण सिंग ग्रोव्हर आणि अक्षय ओबेरॉय प्रमुख भूमिका असून नुकतच या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर कमाई केली आहे.

‘फायटर’ केवळ देशातच नव्हे तर संपूर्ण जगात लहरी बनत आहे. या चित्रपटाला जगभरातील प्रेक्षकांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. ट्रेड ॲनालिस्ट मनोबाला विजयबालन यांनी ‘फायटर’च्या जगभरातील कमाईचे आकडे शेअर केले आहेत. त्यानुसार ‘फाइटर’ने रिलीजच्या पहिल्याच दिवशी जगभरात 36.04 कोटींची कमाई केली. आणि या चित्रपटाने रिलीजच्या पाच दिवसांत जगभरात 225.87 कोटी रुपयांची कमाई केली आहे. सहाव्या दिवशी ‘फायटर’ जगभरात 230 कोटींचा आकडा पार करेल.

follow us