सिद्धार्थ आनंदचा Fighter प्रेक्षकांच्या भेटीला; आयएएफ अधिकाऱ्यांचं स्टँडिंग ओव्हेशन

सिद्धार्थ आनंदचा Fighter प्रेक्षकांच्या भेटीला; आयएएफ अधिकाऱ्यांचं स्टँडिंग ओव्हेशन

Fighter : आज एकीकडे सिद्धार्थ आनंदचा फायटर (Fighter) रिलीज झाला आहे. तर दुसरीकडे फायटरच्या निर्मात्यांनी चाणक्यपुरी नवी दिल्ली येथे भारतीय हवाई दलासाठी (Indian air force ) या चित्रपटाचा विशेष प्रीमियर ठेवला होता. भारतभरातील 100 हून अधिक भारतीय वायुसेना अधिकारी यांनी या प्रीमियरला हजेरी लावली आणि या चित्रपटाचा अनोखा अनुभव घेतला.

Sanjay Raut : ‘महाराष्ट्रात फडणवीसांचं राज्य आहे की अफजलखानाचं?’ राऊतांचा संतप्त सवाल

भारतीय वायुसेनेच्या मार्शल्ससाठी हा विशेष प्रीमियर हा एक स्टार-स्टडेड सोहळा होता. ज्यात दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद आणि फायटर निर्माती ममता आनंद यांच्यासह हृतिक रोशन, दीपिका पदुकोण आणि अनिल कपूर या स कलाकारांनी हजेरी लावली होती. हवाई दलाचे प्रमुख (CAS) एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी यांनी फायटर च खास कौतुक केलं.

Ram Mandir : रामलल्लांच्या चरणी 3.17 कोटींचं दान; 2 दिवसांत 7.5 लाख भक्तांनी घेतलं दर्शन

या महत्त्वाच्या घटनेने भारतीय वायुसेनेच्या अधिकाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिक्रिया दिल्या त्यांना हा चित्रपट केवळ आवडला नाही तर तो “सर्वोत्कृष्ट चित्रपट” आहे अश्या प्रतिक्रिया त्यांना मिळाल्या. भारतीय वायुसेनेच्या बँडने वंदे मातरमचे अनोखं सादरीकरण सुद्धा केल. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित अतूट धैर्याने देशाच्या आकाशाचे रक्षण करणार्‍या IAF अधिकार्‍यांचे शौर्य आणि समर्पणाचे चित्रण या चित्रपटात आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी केले आहे. यामध्ये हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण यांच्याशिवाय अनिल कपूरही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. करण सिंग ग्रोव्हर, अक्षय ओबेरॉय, तलत अजीज सहाय्यक भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट आज 25 जानेवारीला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube