Download App

Parineeti Raghav जोडीने निघाले दिल्लीला, ‘या’ दिवशी ठरला साखरपुड्याचा मुहूर्त?

  • Written By: Last Updated:

Parineeti-Raghav: आम आदमी पक्षाचा नेता आणि खासदार राघव चड्ढा (Raghav Chadha) आणि बाॅलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) हे गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चेत आहेत. मुंबईमध्ये यांना अनेकदा स्पाॅट केले गेले आहे. इतकेच नाही तर यांच्या लग्नाच्या चर्चा देखील जोरदार सुरू आहेत.


या महिन्यात यांचा साखरपुडा पार पडणार असल्याचे सांगितले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून यांच्या लग्नाच्या (Marriage) चर्चा देखील खूपच जोर धरू लागल्या आहेत. राघव चड्ढा याच्याबद्दल परिणीती हिला सवाल विचारण्यात आला की, परिणीती लाजताना दिसते. इतकेच नाही तर परिणीती चोप्रा हिच्याविषयी राघव याला विचारले की, तो देखील लाजत असल्याचे दिसून येत आहे.


चाहते सतत यांना लग्न कधी करणारा हा सवाल विचारत असल्याचे दिसून येत आहेत. आम आदमी पक्षाच्या एका मोठ्या नेत्याने गेल्या काही दिवसांपूर्वी परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देणारी एक पोस्ट ही सोशल मीडियावर शेअर केली होती. या पोस्टसोबत परिणीती आणि राघव यांचा एक फोटो देखील शेअर करण्यात आला होता.

परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा याच्या साखरपुडा कार्यक्रम होणार असल्याची चर्चा सध्या जोर धरत आहे. नुकताच परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा अजून एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये परिणीती आणि राघव हे दिसत असून अत्यंत कुल लूकमध्ये परिणीती चोप्रा ही दिसत आहे. परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा व्हायरल होणारा हा व्हिडीओ विमानतळावरील आहे.

‘मैं अटल हूँ’ सिनेमाचे शूटिंग सुरु, ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता असणार मुख्य भूमिकेत

या व्हिडीओमध्ये परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा हे दोघे गाडीमधून उतरत असल्याचे दिसून येत आहेत. या व्हिडीओमध्ये परिणीती ही राघव याला काहीतरी बोलत देखील आहेत. सतत परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा हे सोबत स्पाॅट होत आहेत. मात्र, पापाराझी यांनी लग्न कधी आहे, हा सवाल विचारताच परिणीती आणि राघव यावर बोलणे टाळत असल्याचे सततच दिसून येत आहे. चाहते देखील परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या लग्नाची वाट बघत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वीच दिल्ली विमानतळावर राघव चढ्डा हा परिणीती चोप्रा हिला घेण्यासाठी पोहचला होता. याचेही काही व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

Tags

follow us