Download App

Video Viral: योगींच्या पाया का पडले? ट्रोल झाल्यावर थलायवा कारण सांगत म्हणाले…

Rajinikanth Video Viral: दाक्षिणात्य सुपरस्टार थलायवा (Rajinikanth) त्याच्या ‘जेलर’ (Jailer) सिनेमामुळे जोरदार चर्चेत आला आहेत. देशात सध्या ‘जेलर’ सिनेमाला जोरदार प्रतिसाद मिळत आहे. शनिवारी ( १८ ऑगस्ट ) थलायवा म्हणजेच रजनीकांत हा उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर होते. थलायवा यांनी लखनऊ येथे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांची भेट घेतली. त्यावेळेस थलायवा यांनी योगी आदित्यनाथ यांच्या पाया पडल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Social media) तुफान व्हायरल होत आहे.

यामुळे सर्व स्तरातून थलायवा यांना ट्रोल करण्यात येतआहे. यावर आता थलायवा यांनी यावर स्पष्टीकरण दिल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. याविषयी थलायवा यांनी चेन्नई विमानतळावर पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांना प्रतिक्रिया दिली आहे. त्यावर आशीर्वाद घेणं ही माझी सवय असल्याचं थलायवा यांनी यावेळी सांगितलं आहे. “योगी असो किंवा संन्याशी, जरी ते माझ्यापेक्षा वयाने लहान असले, तरी त्यांच्या पायांना स्पर्श करून आशीर्वाद घेणं ही माझी सवय आहे. आणि मी तेच केलं आहे,” असं थलायवा यांनी यावेळी सांगितले आहे.

थलायवाचा ‘जेलर’ हा सिनेमा १० ऑगस्ट २०२३ दिवशी चाहत्यांच्या भेटीला आला आहे. थलायवाचाच्या अनेक सिनेमाची चाहत्यांना मोठी उत्सुकता लागली असते, आणि त्याचे सिनेमे चाहते डोक्यावर घेत असतात. प्रदर्शितच्या पहिल्या आठवड्यामध्ये या सिनेमाने २३५.८५ कोटींचा गल्ला कमावला आहे. ११ व्या दिवशी ‘जेलर’ सिनेमाने १८ कोटी रुपयांचा गल्ला कमावला आहे.

Box Office Collection: ‘बॉक्स ऑफिस कलेक्शन; कोण हिट कोण फ्लॉप..? लगेच जाणून घ्या…

देशामध्ये जेलरने २८० कोटींची कमाई केली. तर, जगभरात ५५० कोटींपेक्षा जास्त गल्ला जेलर सिनेमाने जमा केला आहे. थलायवा यांच्या जेलर सिनेमाला देशात आणि जगात चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात प्रेम मिळत आहे.

Tags

follow us