Download App

Vidula Chougule: दहावीत असतानाच मिळाली मालिकेत काम करण्याची संधी; अन् सिद्धीचा ‘जीव झाला येडा पिसा’

  • Written By: Last Updated:

Vidula Chougule: ‘जीव झाला येडा पिसा’ (Jeev Zala Yeda Pisa ) या मालिकेतील सिद्धी ही भूमिका तुम्हाला आठवत असेल. या भूमिकेला प्रेक्षकांची प्रचंड पसंती मिळाली. सिद्धी (Siddhi) भूमिका साकारणारी अभिनेत्री विदुला चौगुले (Vidula Chougule) ही मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. (Marathi serial) विदुलाच्या अभिनयाने तिचे कौतुकही प्रेक्षकांकडून तोंड भरून केले जात आहे. याच विदुलाचा अभिनय क्षेत्रात नाव कमावण्याचा प्रवास कसा होता? तेच आज आपण जाणून घेणार आहोत.


एका मुलाखतीत विदुलाने सांगितले की, ‘जीव झाला येडा पिसा’ या मालिकेचे जेव्हा तिने ऑडिशन दिले तेव्हा ती दहावी मध्ये होती. दहावीत असतानाच तिला मालिकेत काम करण्याची संधी मिळाली. आठवीपर्यंत विदुलाने ‘बालनाट्यामध्ये’ काम केले आहे. पुढे तिला तिचे करिअर सुद्धा अभिनयाच्या क्षेत्रात करायचे होते. मूळची कोल्हापूरची असणारी विदुला सांगते की, कोल्हापुरात जास्त ऑडिशन्स होत नाहीत. पण ‘जीव झाला येडा पिसा’ या मालिकेच ऑडिशन हे कोल्हापुरात झालं होतं. या ऑडिशन दरम्यान दहावीत असणारी विदुला शाळा आणि क्लासमध्ये प्रचंड बिझी होती.

मात्र जेव्हा कोल्हापुरात होणाऱ्या या ऑडिशन बद्दल तिच्या आईने तिला सांगितलं तेव्हा ऑडिशनच्या दिवशी ती शाळा आणि क्लासेसला गेली नव्हती. हे ऑडिशन दिल्यानंतर विदुलाचं लीड रोलसाठी सिलेक्शन झालं. मुख्य भूमिकेसाठी सिलेक्शन होणे हे विदुलासाठी मोठे गिफ्टच होते. ऑडिशन बद्दल बोलताना मी तुला पुढे सांगते की, लीड रोल साठी माझं सिलेक्शन होईल असं मला वाटलं नव्हतं. तिच्या आई-बाबांनीही तिला मालिकेत काम करण्याची परवानगी दिली. विदुलाने आवर्जून या गोष्टीचा उल्लेख केला की, तिच्या आईचा असा विचार होता, ‘आता जर पेपर राहिले तर ते पुरवणी परीक्षेत म्हणजेच ऑक्टोबर महिन्यात देता येतील, पण वर्ष वाया जाणार नाही.

सेक्रेड गेम्स 2 मध्ये इंटिमेट सीन शूट करताना मासिक पाळीच्या… अमृता सुभाषने सांगितला अनुभव

सोबतच विदुलाने सांगितले ऑडिशन नंतर मालिकेच्या प्रोडूसर आणि डायरेक्टर ने माझ्या आई वडिलांना माझ्या दहावी परीक्षा बद्दल विचारले होते. तेव्हा त्यांनी माझ्या भविष्याचा विचार करूनच मला मालिकेत काम करण्यासाठी परवानगी दिली. विदुलाच्या करिअर बद्दल सांगायचं झालं तर तिने ‘जीव झाला येडा पिसा’ या लोकप्रिय मालिकेत सिद्धी ही भूमिका साकारली आणि जी प्रेक्षकांना विशेष पसंत पडली. सोबतच विदुलाने बॉईज-3 या चित्रपटात सुद्धा अभिनय केला आहे. विदुला सोशल मीडियावर नेहमीच ॲक्टिव्ह असते. तिच्या वेगवेगळ्या लूक्स मधील फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते. विदुलाचे ग्लॅमरस अंदाजातील फोटो हे तिच्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेतात.

Tags

follow us