Vijay’s LEO First Look: वाढदिवसाला विजयनं दिलं चाहत्यांना खास गिफ्ट; ‘लियो’ चा फर्स्ट लूक प्रदर्शित

Vijay’s LEO First Look: दाक्षिणात्य सिनेमासृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता विजयचा (Happy Birthday Vijay) आज (२२ जून) ४९वा वाढदिवस आहे. यामुळे विजयचे चाहते त्याला सोशल मीडियाच्या (social media) माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. विजयने नुकतेच त्याच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांना एक खास गिफ्ट दिले आहे. त्याने लियो या सिनेमाचा फर्स्ट लूक (first look) सोशल मीडियावर शेअर केला आहे. #LeoFirstLook […]

Vijay’s LEO First Look

Vijay’s LEO First Look

Vijay’s LEO First Look: दाक्षिणात्य सिनेमासृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता विजयचा (Happy Birthday Vijay) आज (२२ जून) ४९वा वाढदिवस आहे. यामुळे विजयचे चाहते त्याला सोशल मीडियाच्या (social media) माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. विजयने नुकतेच त्याच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांना एक खास गिफ्ट दिले आहे. त्याने लियो या सिनेमाचा फर्स्ट लूक (first look) सोशल मीडियावर शेअर केला आहे.

तसेच या सिनेमाचे दिग्दर्शक लोकेश कनागराज (Lokesh Kanagaraj) यांनी देखील लियो सिनेमामधील विजयचा फर्स्ट लूक सोशल मीडियावर शेअर करुन विजयला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिले आहेत. लियो सिनेमाचे पोस्ट शेअर करुन लोकेश कनागराज यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘हा आहे लियोचा फर्स्ट लूक, वाढदिवसाच्या शुभेच्छा विजय अण्णा, तुझ्याबरोबर पुन्हा काम केल्याचा आनंद होत आहे.

लोकेश कनागराज यांनी देखील शेअर केलेल्या या लियो सिनेमाच्या फर्स्ट लूकमध्ये विजयच्या हातात हतोडा असल्याचे दिसून आला आहे. हा लूक बघून असा अंदाज लावू शकतो की, लियो या सिनेमात विजयचा अॅक्शन अवतार चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. लोकेश कनागराज यांनी शेअर केलेल्या या लियो सिनेमाच्या फर्स्ट लूकला कमेंट करुन अनेकांनी या सिनेमाच्या टीमला मोठ्या प्रमाणात शुभेच्छा दिल्या आहेत.

International Yoga Day: सेलिब्रिटींनी असा साजरा केला योग दिवस, सोशल मिडीयावर Video Viral

लियो सिनेमात विजयबरोबर त्रिशा, संजय दत्त, अर्जुन, प्रिया आनंद, गौतम वासुदेव मेनन, मन्सूर अली खान, सँडी आणि मायस्किन हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार असल्याचे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लियो या सिनेमाचे सध्या शूटिंग सुरु आहे. हा सिनेमा ऑक्टोबर 2023 मध्ये थिएटरमध्ये रिलीज होणार आहे, असंही सांगितले जात आहे.परंतु अजून देखील सिनेमाच्या टीमने या सिनेमाच्या रिलीज डेटविषयी कोणतेही भाष्य केले नाहीत.

बालकलाकार म्हणून विजयने सिनेमामध्ये काम करण्यास सुरुवात केली आहे. १९९२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘नालया थीरपू’ या सिनेमामध्ये पहिल्यांदा लीड अभिनेता म्हणून त्यानं काम केले आहे. तेव्हा विजय १८ वर्षाचा होता. Poove Unakkaga या सिनेमामुळे विजयला विशेष लोकप्रियता मिळाली आहे. विजयच्या आगामी सिनेमाची चाहत्यांना मोठी उत्सुकता लागली आहे.

Exit mobile version