‘या’ दिवशी येणार विजय-रश्मिकाचा ‘वरिसू’

चेन्नई : पुष्पाच्या या दाक्षिणात्य चित्रपटाच्या दमदार यशानंतर आता दाक्षिणात्य अभिनेता विजय थालापती आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांचा ‘वरिसू’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या 13 जानेवारीला हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. नुकताच या चित्रपटाचा हिंन्दीतील ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. थलापती विजयच्या ‘वरिसू’ चित्रपटाचे ट्रेलर रिलीज झाले. चित्रपटात रश्मिका मंदानादेखील मुख्य भूमिकेत […]

Untitled Design (37)

Untitled Design (37)

चेन्नई : पुष्पाच्या या दाक्षिणात्य चित्रपटाच्या दमदार यशानंतर आता दाक्षिणात्य अभिनेता विजय थालापती आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांचा ‘वरिसू’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या 13 जानेवारीला हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
#Varisu (Hindi) Official Trailer | Thalapathy Vijay, Rashmika Mandanna, Vamshi Paidipally | S.Thaman
नुकताच या चित्रपटाचा हिंन्दीतील ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. थलापती विजयच्या ‘वरिसू’ चित्रपटाचे ट्रेलर रिलीज झाले. चित्रपटात रश्मिका मंदानादेखील मुख्य भूमिकेत आहे. ट्रेलरमध्ये विजयच्या अतिशय सुखी संयुक्त कुटुंबाची कथा दाखवण्यात आली, त्याला दोन मोठे भाऊ असतात. सरथकुमार विजयच्या वडिलांची भूमिका साकारत आहेत.

विजयच्या वडिलांच्या व्यावसायिक प्रतिस्पर्ध्याने चित्रपटात प्रवेश केल्यानंतर संपूर्ण कुटुंब विस्कळीत हाेते. यानंतर विजय ताकदीने कुटुंबाची गमावलेली प्रतिष्ठा परत आणण्यासाठी धडपडताना दिसतो.

गोल्डमाइन्स टेलिफिल्म्स प्रायव्हेट लिमिटेड आणि दिल राजू प्रॉडक्शन प्रस्तुत ‘वरिसू’, राजू, शिरीष आणि मनीष शाह निर्मित. दिग्दर्शन वमशी पैडिपल्ली यांनी केले आहे आणि संगीत एस. थमन यांचे आहे. हा चित्रपट हिंदीत AA फिल्म्सद्वारे वितरित केला जाणार आहे.

Exit mobile version