Download App

Vikram Gokhale: विक्रम गोखलेंचा अखेरचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला, ‘सुर लागू दे’चा पोस्टर प्रदर्शित

Vikram Gokhale New Marathi Movie Sur Lagu De : मराठी अभिनेता विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांचा ‘सूर लागू दे’ (Sur lagu De) हा मराठी सिनेमा लवकरच चाहत्यांच्या भेटीला येत आहे. (Marathi Movie) आता या सिनेमाचं नवं पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. (Vikram Gokhale Last Movie) पोस्टर प्रदर्शित झाल्याने चाहत्यांची आता या सिनेमाची प्रतीक्षा वाढत असल्याचे दिसत आहे. 12 जानेवारी 2024 दिवशी हा सिनेमा चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.


रंगभूमीपासून मराठी-हिंदी सिनेसृष्टीपर्यंत आपल्या अभिनयाचा अनोखा ठसा उमटवणारे अभिनेते विक्रम गोखले यांनी गेल्यावर्षी इहलोकीची यात्रा संपवली असली तरी कलेच्या माध्यमातून ते अजरामर आहेत. प्रतिकूल परिस्थितीमध्ये देखील आपल्या वाट्याला आलेलं काम चोख बजावणं हा अतिशय दुर्मिळ गुण विक्रम गोखले यांच्यामध्ये बघायला मिळत असत.

या बळावर त्यांनी अखेरच्या काळात अनेकदा प्रकृती अस्वस्थ असताना देखील आपल्या व्यक्तिरेखेला न्याय देण्यासाठी मोठ्या जिद्दीनं पुन्हा एकदा कॅमेरा फेस केल्याचे ठरवले आहे. विक्रम गोखले यांच्या पश्चात अत्यंत जड अंत:करणारे ‘सूर लागू दे’ हा मराठी सिनेमा त्यांचा अखेरचा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचं नवीन पोस्टर नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं आहे.

Dunki Teaser Release date: किंग खानच्या वाढदिवशी चाहत्यांना मिळणार खास गिफ्ट

या मराठी सिनेमात झळकलेली रीना मधुकर आणि ‘कलियों का चमन…’ फेम मेघना नायडू या सिनेमातील मोठं सरप्राईज पॅकेज ठरणार आहेत. त्यांच्या जोडीला आशिष नेवाळकर, जयराज नायर, सुनील गोडबोले, सिद्धेश्वर झाडबुक्के, नितीन जाधव, आशा न्याते, मेरू वेरणेकर, अनुराधा मोरे, शेखर शुक्ला, संदीप गायकवाड, हितेंद्र उपासनी, प्रदीप पटवर्धन, अस्लम वाडकर, सोमनाथ तळवलकर, सुनील जाधव, दीपिका गोलीपकर, अलका परब, अतुल गानोरकर, दिलीप कराडे, संदीप जयगडे, अमोघ चव्हाण, औदुंबर बाबर आदी कलाकारांच्या या सिनेमात महत्वाच्या भूमिका बजावताना बघायला मिळणार आहेत.

Tags

follow us