Download App

‘12 वी फेल’ चित्रपटासाठी विक्रांत मॅसीला सर्वोत्तम अभिनेता म्हणून राष्ट्रीय पुरस्कार

Vikrant Massey : अत्यंत प्रतिभावान आणि समर्पित अभिनयासाठी ओळखला जाणारा विक्रांत मॅसी याला ‘12वी फेल’ (12th Fail) या चित्रपटातील प्रभावी

  • Written By: Last Updated:

Vikrant Massey : अत्यंत प्रतिभावान आणि समर्पित अभिनयासाठी ओळखला जाणारा विक्रांत मॅसी याला ‘12वी फेल’ (12th Fail) या चित्रपटातील प्रभावी भूमिकेसाठी राष्ट्रीय पुरस्कार ( National Award 2025) सर्वोत्तम अभिनेता या प्रतिष्ठित सन्मानाने गौरवण्यात आले आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक विधु विनोद चोप्रा दिग्दर्शित या चित्रपटात विक्रांतने खऱ्या आयुष्यातील आयपीएस अधिकारी मनोज कुमार शर्मा यांची भूमिका साकारली आहे.

हा चित्रपट एका सामान्य कुटुंबातून आलेल्या तरुणाच्या असामान्य प्रवासाची कथा सांगतो ज्याने कठीण परिस्थितीतही मोठं स्वप्न पाहण्याचं धाडस केलं. दारिद्र्य, आत्मसंशय आणि भारतातील सर्वात कठीण समजल्या जाणाऱ्या यूपीएससी परीक्षेच्या दबावातून मार्ग काढत मनोजचा संघर्ष आणि आत्मविश्वास प्रेक्षकांच्या मनाला भिडतो. विक्रांत मॅसीने (Vikrant Massey) या भूमिकेतून आपल्या पिढीतील सर्वोत्तम अभिनेत्यांपैकी एक असल्याचं सिद्ध केलं आहे.

मनोजच्या व्यक्तिरेखेत विक्रांतने दाखवलेली प्रामाणिकता, संवेदनशीलता आणि भावनिक खोली यांची विशेष दखल घेतली गेली आहे. त्याने साकारलेली व्यक्तिरेखा ही प्रेक्षकांना जवळची वाटते, आणि ती प्रेरणादायी देखील ठरते. समीक्षकांनी देखील विक्रांतच्या अभिनयाचं विशेष कौतुक करत त्याला अलीकडच्या काळातील सर्वोत्तम अभिनय मानलं आहे.

हा राष्ट्रीय पुरस्कार विक्रांतच्या कठोर मेहनतीचं व समर्पणाचं फलित आहे आणि त्याच्या कारकिर्दीतील एक महत्त्वाचा टप्पा ठरतो. दूरचित्रवाणीपासून चित्रपटसृष्टीपर्यंतच्या प्रवासात त्याने सातत्याने अशा भूमिका साकारल्या आहेत ज्या प्रामाणिकपणा आणि गहिरं व्यक्तिमत्त्व यांना उजाळा देतात. प्रत्येक प्रकल्पात तो आपली अभिनयक्षमता सिद्ध करतो आणि त्यामुळे तो आजच्या घडीला भारतीय चित्रपटसृष्टीतील एक अत्यंत विश्वासार्ह व आदरार्ह अभिनेता ठरला आहे.

मोठी बातमी! ‘कथल: अ जॅकफ्रूट मिस्ट्री’ ला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 

विक्रांत लवकरच आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांच्या जीवनावर आधारित आगामी बायोपिकमध्ये दिसणार आहे. आणखी एक आव्हानात्मक भूमिका जी त्याच्या अभिनयातील विविधता आणि धाडस अधोरेखित करते. राष्ट्रीय पुरस्कार आणि यादगार भूमिका यांच्या जोरावर विक्रांत मॅसी आता निश्चितच भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक मागणी असलेला आणि मान्यता प्राप्त अभिनेता बनला आहे.

follow us