Download App

‘मी दिवाळखोर झालोयं’; ‘काश्मीर फाईल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींचं मोठं विधान…

Vivek Agnihotri : ‘द काश्मीर’ दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी एक मोठं विधान केलं आहे. मी दिवाळखोर झालो असल्याचं त्यांनी एका मुलाखतीदरम्यान, सांगितलं आहे. एका वृत्तसंस्थेच्या मुलाखतीत त्यांना आगामी चित्रपटांत तुम्हाला अर्थिक यश मिळेल का? असा सवाल विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी हे उत्तर दिलं आहे. (i am bankrupt the kashmir files director vivek agnihotri Says)

Sana Khan Murder Case : सना खान हत्येतील आरोपी जेरबंद! कशी केली हत्या? आरोपीकडून कबुली

पुढे बोलताना विवेग अग्निहोत्री म्हणाले, मी अर्थिक गोष्टींकडे अधिक लक्ष दिलेल नाही, मी द काश्मिर फाईल्स चित्रपटांतून कमवलेले पैसे पुढील चित्रपटासाठी खर्च केले आहेत. माझा आगामी चित्रपट द व्हॅक्सिन वॉर चित्रपटासाठी मी कमवलेले पैसे खर्च केलेले आहेत, त्यामुळे मी आता दिवाळखोर झालो, असल्याचं अग्निहोत्री यांनी स्पष्ट केलं आहे.

इम्रान खान यांच्या अटकेनंतर भेटवस्तूंचा लिलाव: जमा होणारी रक्कम गरीबांना वाटणार

तसेच अग्निहोत्री यांना काश्मिर फाईल्स चित्रपटात काही सीन्स चुकल्याबाबतची शंका काही लोकं उपस्थित करत असल्याचं विचारण्यात आल्यानंतर ते संतापल्याचं दिसून आले. ते म्हणाले, जे लोकं नेहमी कलम 370 विरोधात होते, तेच लोकं काश्मिर फाईल्सच्या विरोधात बोलत आहेत. हेच लोकं अप्रत्यक्षपणे दहशतवादाचं समर्थन करत आहेत. हे लोकं फ्री काश्मिरच्या समर्थनात असून दहशतवाद्यांवर ते का दया दाखवतात? हे शोधून काढा, मग ते काश्मिर फाईल्सच्या विरोधात का होते? हे समोर येईल, असंही ते म्हणाले आहे.

दरम्यान, विवेक अग्निहोत्री यांची डॉक्युमेंटरी ‘The Kashmir Files Unreported’चा पहिला सिजन प्रदर्शित होणार आहे. तसेच डॉक्युमेंटमधून काश्मिरी पंडित त्यांच्या कथा सांगत आहेत. तसेच ‘द व्हॅक्सिन वॉर’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Tags

follow us