इम्रान खान यांच्या अटकेनंतर भेटवस्तूंचा लिलाव: जमा होणारी रक्कम गरीबांना वाटणार

इम्रान खान यांच्या अटकेनंतर भेटवस्तूंचा लिलाव: जमा होणारी रक्कम गरीबांना वाटणार

Imran Khan arrest : तोशाखान्यात (सरकारी खजिन्यात) ठेवलेल्या भेटवस्तूंचा पाकिस्तान सरकार लिलाव करणार आहे. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी ही घोषणा केली आहे. या भेटवस्तूंच्या लिलावातून जमा होणारी रक्कम गरीब आणि गरजूंच्या मदतीसाठी वापरली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

तोशाखाना प्रकरणात पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. इम्रान खान यांनी पंतप्रधान असताना विविध देशांकडून मिळालेल्या भेटवस्तू विकल्या होत्या. या सर्व भेटवस्तू त्यांनी तोशाखान्यातून 2.15 कोटी रुपयांना विकत घेतल्या होत्या, त्यांची विक्री केल्यावर त्यांना 5.8 कोटी रुपये मिळाले होते. नंतर ही रक्कम 20 कोटींहून अधिक असल्याचे उघड झाले.

भारतीय नौदलात अधिकारी व्हायचं? मग आत्ताच अर्ज करा, शॉर्ट सर्विस कमिशन पदांच्या 35 जागांसाठी भरती सुरू

पाकिस्तानी मीडिया एआरवाय न्यूजनुसार, पीएम शाहबाज शरीफ म्हणाले, आम्ही तोशाखाना भेटवस्तूंचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. यातून जमा होणारा पैसा अनाथ मुले, रुग्णालये, शिक्षण संस्था, कल्याणकारी संस्था आणि गरजूंना मदत करण्यासाठी वापरला जाणार आहे.

Kangana Ranaut अन् जावेद अख्तर यांच्यातील वाद चिघळला; कोर्टाने अभिनेत्रीकडे केली ‘ही’ मागणी !

तोशाखाना प्रकरणी इम्रानला तीन वर्षांची शिक्षा
इस्लामाबाद ट्रायल कोर्टाने 5 ऑगस्ट रोजी तोशाखाना प्रकरणात इम्रान खानला तीन वर्षांची शिक्षा सुनावली होती. न्यायालयाने माजी पाकिस्तानी पंतप्रधानांना एक लाख पाकिस्तानी रुपयांचा दंडही ठोठावला आहे. यानंतर लाहोर पोलिसांनी पीटीआय अध्यक्षांना त्यांच्या जमान पार्क येथील घरातून अटक केली. नंतर त्यांना इस्लामाबादला आणण्यात आले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube