भारतीय नौदलात अधिकारी व्हायचं? मग आत्ताच अर्ज करा, शॉर्ट सर्विस कमिशन पदांच्या 35 जागांसाठी भरती सुरू

भारतीय नौदलात अधिकारी व्हायचं? मग आत्ताच अर्ज करा, शॉर्ट सर्विस कमिशन पदांच्या 35 जागांसाठी भरती सुरू

Indian Navy Recruitment 2023 : भारतीय नौदलात  (Indian Navy) काम करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. ती म्हणजे भारतीय नौदलाने शॉर्ट सर्व्हिस कमिशनकडून अधिकारी पदांसाठीची भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी 4 ऑगस्टपासून अर्ज करायला सुरूवता झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 ऑगस्ट 2023 आहे. भारतीय नौदल SSC अधिकारी भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचे स्थान, एकूण रिक्त जागा आणि अर्ज शुल्क याबद्दलची तपशीलवार माहिती अधिकृत नोटीफिकेशमध्ये दिली आहे. (Indian Navy Recruitment for Short Service Commissioned Officer Posts, Total 35 Vacancies)

भारतीय नौदलाच्या भरतीसाठी अर्ज करताना पात्र उमेदवारांनी अर्जासोबत 10वी, 12वी आणि शैक्षणिक प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचे प्रमाणपत्र, ओळखपत्र आणि पासपोर्ट आकाराचा फोटो यांसारखी कागदपत्रे जोडावीत.

भारतीय नौदलातील या भरतीसाठी राखीव श्रेणीतील उमेदवारांना सरकारी नियमांनुसार वयात सवलत दिली जाते. तपशील विवरणपत्रात दिलेला आहे. महत्त्वाचे म्हणजे, उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संबंधित सूचना काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. कारण, अर्जात काही त्रुटी आढळल्यास अर्ज फेटाळला जाईल.

एकूण रिक्त पदे – 35

पदाचे नाव – शॉर्ट सर्व्हिस कमिशन ऑफिसर एसएससी – एक्झिक्युटिव्ह (आयटी).

Kangana Ranaut अन् जावेद अख्तर यांच्यातील वाद चिघळला; कोर्टाने अभिनेत्रीकडे केली ‘ही’ मागणी !

शैक्षणिक पात्रता –
60% गुणांसह M.Sc/B.E/B.Tech/M Tech in Computer Science/Computer Engineering/IT/Software Systems/Cyber Security/System Administration & Networking/Computer Systems & Networking/Data Analytics/artificial Intelligence)किंवा  MCA + BCA/ B.Sc (संगणक विज्ञान + IT)

वय श्रेणी –
उमेदवाराचा जन्म 2 जानेवारी 1999 ते 1 जुलै 2004 दरम्यान झालेला असावा.
SC आणि ST उमेदवारांना 5 वर्षांची सूट
ओबीसी उमेदवारांना 3 वर्षांची सूट

अर्ज फी – उमेदवारांकडून कोणतेही अर्ज शुल्क आकारले जाणार नाही.

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.

अधिकृत वेबसाइट – https://wwwindiannavy.nic.in/

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख –
20 ऑगस्ट 2023

जाहिरात –
https://drive.google.com/file/d/1XwhSdsp8mbA7ZuJO-rE_Cp7sD4OpMSna/view?usp=sharing

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube