Vivek Agnihotri Resigned: ‘द काश्मीर फाईल्स’ (The Kashmir File) या सिनेमातून जोरदार चर्चेत असलेले बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांनी आता आपल्या कारकिर्दीबद्दल एक मोठं वक्तव्य केलं आहे. बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री त्यांच्या विचार आणि स्पष्वक्तेपणामुळे कायम चर्चेत असल्याचे बघायला मिळत असतात. आता विवेक अग्निहोत्रींनी बॉलिवूड कलाकारांना मूर्ख संबोधले आहे, अशा लोकांबरोबर काम करू शकत नाही आणि बॉलिवूडचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.
विवेक अग्निहोत्रींने सांगितले आहे की, ते व्यावसायिक आता सिनेमापासून ब्रेक घेणार आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये विवेक यांनी मोठा खुलासा केला आहे की, त्यांनी आता व्यावसायिक सिनेमा करणे सोडले आहे. ते सांगितले आहेत की, ‘मी ज्या कलाकारांसोबत काम केले, त्यांना या जगाबद्दल फारसे माहीतच नाही. मी हे मुद्दामपणाने बोलतोय असे नाही, तर मी खरे सांगतोय. मला आता असे वाटू लागले की, मी ज्या कलाकारांसोबत काम करत आहे, ते शिकलेले नाहीत आणि त्यांना जगाची काहीच समज नाही. मी त्यांच्यापेक्षा जास्त हुशार आहे आणि माझा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन त्यांच्यापेक्षा खूप वेगळा आणि चांगला आहे.’
बॉलिवूड कलाकारांमुळे आज आपला सिनेमा पूर्णपणे मूक झाला असल्याचे विवेक यावेळी सांगितले आहे. ‘भारतीय सिनेमा इतका मूर्ख आहे का? याला कारण आपले कलाकार देखील आहेत. हे कलाकार दिग्दर्शक आणि लेखकांना देखील मूर्ख बनवतात’ ते उद्वीग्नपणे यावेळी म्हणाले आहेत. व्यावसायिक सिनेमातून राजीनामा देण्यामागचे कारण स्पष्ट करताना असताना विवेक म्हणाले की, ‘सिनेमा माझ्यामुळे कधीच ओळखला जात नाही, सिनेमा नेहमीच मूर्ख अभिनेत्यांमुळे ओळखला जात असतो. यामुळे मी मानसिकदृष्ट्या आता बॉलिवूडमधून राजीनामा देत असल्याचे त्याने यावेळी सांगितले आहे.
Prabhas: काय… प्रभासच्या डोक्यावर केसच नाहीत? अभिनेत्याच्या ‘त्या’ व्हायरल फोटोमुळे चाहत्यांना धक्का
व्यावसायिक सिनेमामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या विवेक अग्निहोत्री यांनी आतापर्यंत ‘चॉकलेट’, ‘धना धन गोल’ आणि ‘हेट स्टोरी’ यांसारख्या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. परंतु, गेल्या काही वर्षांमध्ये विवेक अग्निहोत्रीने समाजाला आरसा दाखवणारे उत्कृष्ट सिनेमा बनवले आहेत. ज्यामध्ये ‘द ताश्कंद फाइल्स’ आणि ‘द कश्मीर फाइल्स’ सारख्या हटके सिनेमाचा देखील यामध्ये समावेश आहे.