Download App

Vivek Oberoiची कोट्यवधींची फसवणूक; काय आहे नेमकं प्रकरण?

Vivek Oberoi : बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉयची (Vivek Oberoi) मोठी फसवणूक करण्यात आली आहे. याबद्दल एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये (MIDC Police Station) तिघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. १.५५ कोटीची फसवणूक (Fraud) केल्याचा आरोप त्याने यावेळी लावला आहे. आरोपींनी अभिनेत्याला एका कार्यक्रमामध्ये पैसे गुंतवायला लावले, आणि स्वत:च्या फायद्यासाठी त्या पैशांचा वापर करण्यात आल्याचे अभिनेत्याने आरोप केले आहे.


विवेक ओबेरॉय आणि त्यांची बायको प्रियांकाची १.५५ कोटी रुपयांची मोठी फसवणूक करण्यात आली आहे. एंटरटेनमेंट कंपनी (Entertainment Company) आणि एका सिनेमाच्या निर्मितीसाठी ओबेराय यांना आरोपींनी १.५५ कोटी रुपये गुंतवण्यास सांगितले होते. यामधून मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा होणार असल्याचे देखील यावेळी सांगितले होते.

परंतु सिनेमा निर्मिती न करता ती सर्व रक्कम आरोपींनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी वापरल्याचे आरोप अभिनेत्याने केला आहे, म्हणून विवेक ओबेराय यांनी मुंबईतील एमआयडीसी पोलीस ठाण्यात या प्रकरणाविषयी तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी कलम ४०९ आणि ४२० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिने-निर्माते संजय शहा, त्यांची आई नंदिता शाह, राधिका नंदा या आरोपीच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Manipur महिलांवरील अत्याचाराचा व्हिडीओ पाहून कलाकारांनी व्यक्त केला संताप, ट्वीट करत म्हणाले…

या प्रकरणाचा अधिकचा तपास पोलीस करत आहेत. आरोपांच्या आधारे एमआयडीसी पोलिसांनी बुधवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. विवेक ओबेरॉय आणि आरोपी यांना सिने-निर्मिती संबंधित एक नवीन कंपनी सुरू करायचे होते. विवेकने याअगोदर २०१७ मध्ये ‘ओबेरॉय ऑरगॅनिक्स नावाची कंपनी सुरू केली होती. परंतु या कंपनी मधून नफा मिळत नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. तसेच त्यांनी तीन आरोपींना फर्ममध्ये भागीदार म्हणून आणण्याचा निर्णय देखील घेतला होता. परंतु भागीदारांनी फसवल्याचे लक्षात आल्यावर लगेचच त्यांनी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags

follow us