Download App

शाहरुखसोबत फिजिकल रिलेशन होते का?, प्रसिद्ध अभिनेत्याचा मोठा खुलासा, नेमकं काय म्हणाला?

शाहरुख आणि विवेक वासवानी यांच्यात शारीरिक संबंध असल्याच्या चर्चा होत्या. या चर्चांवर आता विवेकने मौन सोडलं.

  • Written By: Last Updated:

Vivek Vaswani On Shahrukh Khan: बॉलिवूडचा अभिनेता शाहरुख खानचं (Shahrukh Khan) नावही अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं होतं. मात्र, केवळ अभिनेत्रीच नाही तर काही अभिनेत्यांसोबतही त्याच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. शाहरुख आणि विवेक वासवानी (Vivek Vaswani) यांच्यात शारीरिक संबंध (Physical relationship) असल्याच्या चर्चा होत्या. दरम्यान, सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीमध्ये या चर्चांवर आता विवेकने मौन सोडलं.

शेवटच्या चेंडूवर चौकार अन् पाकिस्तानचा पराभव; थरारक सामन्यात वेस्टइंडिज विजयी 

‘शाहरुखसोबत शारीरिक संबंध…’
विवेक वासवानी आणि शाहरुख खान यांच्यात शारीरिक संबंध असल्याच्या अनेक बातम्या आल्या होत्या. दरम्यान, सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखती दरम्यान, विवेकला विचारण्यात आलं की, तुझे आणि शाहरुख खानचे शारीरिक संबंध होते का? तेव्हा तो म्हणाला, नाते? म्हणजे नक्की काय? सेक्शुअल रिलेशनशिप का? तर नाही… शाहरुख अजिबातच असा नाही. ही अफवा कुठून आली हे मला माहित नाही. पण, मी घरी होतो. माझे आई आणि बाबा देखील तिथंच होते. टेन्शन होतं सगळ्याचं. करिअर होतं. त्याला लवकरच गौरीशी लग्न करायचे होते. या सगळ्यात आमच्यात फिजिकल रिलेशनशिप कसं असेल? ती फक्त मैत्री होती. फिजिकल रिलेशनशिपबाबत तो विचारही करू शकत नाही, असं विवेकने पुढे सांगितलं.

Shreya Bugde : श्रेया बुगडेचं लेटेस्ट फोटोशूट; काळ्या साडीत दिसतेय एकदम हटके… 

यावेळी विवेकने शाहरुख आणि करण जोहरमध्ये शारीरिक संबंध असल्याच्या चर्चांवरही भाष्य केलं. तो म्हणाला, शाहरुखच्या आणि करण सोबतच्या नात्यामुळे अनेकांनी ही अफवा पसरवण्याचा प्रयत्न केला. पण जसजसे तुम्ही मोठे स्टार बनता, तसतसे तुमचा दर्जा वाढतो, लोक सर्व प्रकारच्या गोष्टी बोलू लागतात. पण हे सर्व खरे नाही, असं सांगत विवेकनं या सर्व गोष्टींना फक्त अफवा असल्याचं म्हटलं.

शाहरुख आणि प्रियांका चोप्राच्या अफेअरच्या चर्चांवरही यावेळी विवेकला विचारण्यात आलं. ‘डॉन २’ चित्रपटात एकत्र काम करताना शाहरुख आणि प्रियांकाचं नावं जोडलं गेलं होतं.काही वृत्तांतांमध्ये असा दावा करण्यात आला होता की,प्रियांकासोबतच्या अफेअरमुळे शाहरुखचे गौरीशी भांडण झाले होते. मात्र, विवेक वासवानीने या अफेअरच्या बातम्या खोट्या असल्याचे म्हटलं. तो म्हणाला, ‘हे खरं नाही. जेव्हापासून मी त्याला ओळखतो तेव्हापासून तो ‘One Woman Man’ आहे.

follow us