Vivian Richards-Nina Gupta ची लेक मसाबा अडकली लग्नबंधनात

नवी मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता (Neena Gupta) आणि क्रिकेटपटू विवियन रिचर्ड्स (Vivian Richards) यांची लेक मसाबा गुप्ता (Masaba Gupta) नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे. मसाबाच्या लग्नसोहळ्यातील एक फॅमिली फोटो नीना गुप्ता यांनी शेअर केला आहे. अभिनेता सत्यदीप मिश्रासोबत (Satyadeep Mishra)तिने रितसर विवाह केलाय. गेल्या काही दिवपांसून मसाबा बॉयफ्रेंड सत्यदीप मिश्रा याला डेट करत होती. […]

Untitled Design (4)

Untitled Design (4)

नवी मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता (Neena Gupta) आणि क्रिकेटपटू विवियन रिचर्ड्स (Vivian Richards) यांची लेक मसाबा गुप्ता (Masaba Gupta) नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे. मसाबाच्या लग्नसोहळ्यातील एक फॅमिली फोटो नीना गुप्ता यांनी शेअर केला आहे. अभिनेता सत्यदीप मिश्रासोबत (Satyadeep Mishra)तिने रितसर विवाह केलाय.

गेल्या काही दिवपांसून मसाबा बॉयफ्रेंड सत्यदीप मिश्रा याला डेट करत होती. यानंतरच दोघांनी रितसर विवाह केला आहे. या विवाहाचे काही फोटो मसाबाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

बॉलिवूडची प्रसिद्ध फॅशन डिझायनर मसाबा गुप्ताने तिच्या इंन्स्टाग्रामवर लग्नातील काही फोटो शेअर केले आहेत. या विवाहाला काही मोजकेच नातेवाईक आणि मित्रमंडळींनी उपस्थिती लावली होती. यावेळी मसाबाने पिंक- ग्रीन कलरच्या लेहेग्यांत तर सत्यदीप पिंक रंगाच्या शेरवानीत दिसला.

नीना गुप्ता यांनी मसाबाच्या दुसऱ्या लग्नसोहळ्यातील फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोत नीना गुप्ता, त्यांचे पती, विवियन रिचर्ड्स, मसाबा, सत्यदीप, सत्यदीपची आई आणि बहीण दिसत आहेत. फोटो शेअर करत त्यांनी लिहिलं आहे,”मुलगी, नवीन मुलगा, मुलाची आई, मुलाची बहीण, मुलाचे वडील, मी आणि माझा नवरा”.

मसाबा गुप्ता आणि सत्यदीप मिश्रा दोघांचही हे दुसरं लग्न आहे. ‘मसाबा मसाबा’ या वेबसीरिजदरम्यान दोघांची मैत्री झाली. पुढे मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. अखेर 27 जानेवारी 2023 रोजी मसाबा आणि सत्यदीप लग्नबंधनात अडकले आहेत.

मसाबा गुप्ता 2015 साली सिने-निर्माता मधु मंटेनासोबत लग्नबंधनात अडकली होती. पण त्यांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. अखेर 2019 साली ते विभक्त झाले. तर दुसरीकडे सत्यदीप मिश्रा 2009 साली अभिनेत्री आदिती राव हौदरीसोबत लग्नबंधनात अडकला होता. पण 2013 साली त्यांचा घटस्फोट झाला.

Exit mobile version